४९ शेतकरी व ९ व्यापाºयांवर गुन्हे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:04 AM2017-09-01T01:04:09+5:302017-09-01T01:04:09+5:30
नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील केंद्रांवरील तूर विक्रीचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार आहे.
जिल्ह्यात नाफेडने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासह परतूर, तीर्थपुरी, अंबड येथे तूर हमी भाव केंद्र सुरु केले होते. तसेच जालना नाफेड केंद्रावर परजिल्ह्यातील तुरीची विक्री झाल्याने समोर आले. या केंद्रांवर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने काही व्यापाºयांनी शेतकºयांच्या नावावर तूर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तशा तक्रारीही प्रशासनाकडे करण्यात आल्या.
याची गंभीर दखल घेत यासंदर्भात सविस्तर चौकशीचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. परंतु तूर विक्री केलेल्या संशयास्पद शेतकºयांची संख्या तब्बल ८४०० होती.
सर्व कागदपत्रे तपासणे शक्य नसल्याने जालना, परतूर, अंबड व तीर्थपुरी येथील केंद्राशी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पणन विभागाचे अधिकारी, सहनिबंधक कार्यालय, खरेदी विक्री संघाच्या अधिकाºयांच्या चार समित्या गठित करण्यात आल्या.
जालना येथील चौकशी समितीने चौकशी अहवाल काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना सादर केला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी चौकशीत दोषी ठरलेल्या ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. परतूर, अंबड व तीर्थपुरी नाफेड केंद्रावर विक्री झालेल्या तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. याचा अहवाल शुक्रवारी पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.
पालकमंत्र्यांनी आढावा बैठक आयोजित केली असून, दोषींवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.