जेवत्या गड्याने कमविली ५ एकर ५ गुंठे शेती

By Admin | Published: December 11, 2014 12:25 AM2014-12-11T00:25:56+5:302014-12-11T00:42:31+5:30

संदीप अंकलकोटे , चाकूर तोंडावर मिसरूट फुटत असतानाच वडिलांचा आधार कोसळला़ हे दु:ख पचवित असतानाच अवघ्या दोन महिन्यात मायेचे छत्रही हरवले़ त्यामुळे पोटाची भ्रांत पडली़

5 acres of sugarcane farming | जेवत्या गड्याने कमविली ५ एकर ५ गुंठे शेती

जेवत्या गड्याने कमविली ५ एकर ५ गुंठे शेती

googlenewsNext


संदीप अंकलकोटे , चाकूर
तोंडावर मिसरूट फुटत असतानाच वडिलांचा आधार कोसळला़ हे दु:ख पचवित असतानाच अवघ्या दोन महिन्यात मायेचे छत्रही हरवले़ त्यामुळे पोटाची भ्रांत पडली़ एका शेतकऱ्याच्या शेतात दोन वेळच्या जेवणावर नोकरी पत्करून संसाराचा गाडा उभारला आणि आज ५ एकर ५ गुंठे शेती घेतल्याची कथा चाकूर तालुक्यातील घारोळा येथील शेतकरी रसुल नबीसाब शेख यांची आहे़ घारोळा येथील रसुल नबीसाब शेख यांना चार भाऊ, आई, वडील, असा परिवार होता़ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सर्वजण मोलमजुरी करत़ दोेघा भावांचे आजारात निधन झाले़ त्यानंतर काही काळ उलटताच पितृछत्र हरवले़ त्यापाठोपाठ मायेचा आधारही हरपला़ अशा परिस्थितीत त्यांनी धोंडिराम चिंते यांच्या शेतात जेवता गडी म्हणून नोकरी पत्करली़ त्यानंतर विवाह झाला़
निसर्ग नियमानुसार दोन मुले, एक मुलगी झाली़ पत्नी आणि रसुल शेख यांनी हाती पडेल ते काम करून संसाराचा गाडा उभारला़ झालेल्या कमईतून मासिक पैै पै बचत केली़ या बचतीतून १९९० मध्ये घारोळा शिवारात ३ एकर ५ गुंठे जमीन घेतली़ स्वत:ची जमीन कसण्याबरोबरच दुसरीकडे काम सुरुच ठेवले़ त्याच आधारावर पुन्हा १९९३ मध्ये २ एकर जमीन खरेदी केली़ आज त्यांच्या कुटुंबाकडे ५ एकर ५ गुंठे शेती असून, ती शेती ते स्वत: कसतात़ शेतीतील उत्पन्नातून शेख यांनी दीड लाख रूपये खर्चुन मुलीचा विवाह केला आहे़ आज त्यांचे वय ६५ असून, तेवढ्याच हिरीरीने शेतीकडे पाहतात़
एखाद्या वर्षी नापिकी झाली म्हणून काय झाले़ ती आमच्यासाठी धनच आहे, असे ते सांगतात़ शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर करीत असून, ठिबक सिंचनावर आता शेती बहरली आहे़ शेती करीत करीत त्यांनी जोड व्यवसायावरही भर दिला आहे़ त्यामुळे एखाद्या वर्षी शेतीने साथ नाही दिली तरी त्याचा आपल्या कुटुंबावर अपेक्षित परिणामी ते जाणवू देत नाहीत़

Web Title: 5 acres of sugarcane farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.