वाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:36 PM2018-09-21T16:36:54+5:302018-09-21T16:37:44+5:30

सिडको वाळूज महानगरातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या ५ दुचाकी बुधवारी (दि.१९) मध्यरात्रीनंतर लांबविल्या.

A 5-bicycle theft in the same night at Waluj | वाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास

वाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास

googlenewsNext

औरंगाबाद : सिडको वाळूज महानगरातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या ५ दुचाकी बुधवारी (दि.१९) मध्यरात्रीनंतर लांबविल्या. सिडको वाळूज महानगरातील साक्षीनगर येथून एकाच रात्रीत चोरट्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ५ दुचाकी लंपास केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. दुचाकी चोरीच्या घटनेमुळे वाळूज महानगरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबीप्रमुख फौजदार लक्ष्मण उंबरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय सुखदेव सुलताने (रा. साक्षीनगर, सिडको वाळूज महानगर- १) यांनी बुधवारी त्यांची दुचाकी (एमएच-२०, सीपी-१२९८) पार्किंगमध्ये उभी केली होती. गुरुवारी सकाळी सात वाजता सुलताने यांचा भाऊ राजू हे कामानिमित्त बाहेर निघाले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दुचाकी चोरीची सोसायटीत चर्चा होताच येथील आणखी चार जणांच्या दुचाकी गायब झाल्याचे उघडकीस आले. यात भीमराव प्रधान (एमएच- २०, ईजी- ५७२०), रुकेश राऊत (एमएच - २०, सीव्ही - १२३०), गौरव कुमार (यूपी - ७९, क्यू - ४१३५), संदीप चव्हाण (एमएच - २०, ईक्यू - ७९९९) या चौघांच्या दुचाकी चोरीला गेल्या. वडगावचे माजी सरपंच महेश भोंडवे यांचीही घरासमोर उभी केलेली दुचाकी (एमएच - २०, बीएक्स - ७७) १६ सप्टेंबरच्या रात्री चोरी गेली आहे. 

पोलिसांची रात्रीची गस्त घटली
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविताच मध्यंतरी या घटनांवर आळा बसला होता; परंतु तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाली आहे. सध्या पोलिसांचे अधिक लक्ष गणेशोत्सवातील घटना-घडामोडीवर आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, रांजणगाव,जोगेश्वरी आदी परिसरात  पोलिसांची गस्त कमी झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन दुचाकीचोर पुन्हा सक्रिय झाले आहेत.

वाहनधारकांत भीतीचे वातावरण
स्थानिक पोलीस चोरीच्या घटना थांबविण्यात अपयशी ठरत आहेत. कर्मचारी वर्ग कमी असल्याने पोलिसांचा रात्रीचा पहारा कमी झाला आहे. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. चोरटे काही विशिष्ट प्रकारच्या दुचाकीलाच लक्ष करीत आहेत. या वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: A 5-bicycle theft in the same night at Waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.