रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून ५० कोटी मंजूर
By | Published: December 5, 2020 04:06 AM2020-12-05T04:06:34+5:302020-12-05T04:06:34+5:30
१५२ कोटी रुपयांमधून महापालिका, एमएसआरडीसी आणि एमआयडीसी या तीन संस्थांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना ...
१५२ कोटी रुपयांमधून महापालिका, एमएसआरडीसी आणि एमआयडीसी या तीन संस्थांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना आजारामुळे मागील आठ महिन्यांपासून हे काम थांबले होते. शुक्रवारी महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना पालकमंत्री सुभाष देसाई यांचा फोन आला. रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वाट्याच्या ५० कोटींना मंजुरी मिळाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या रस्त्यांची कामे होणार
१) वोखोर्ड कंपनी ते जयभवानी चौक, नारेगाव रस्त्याचे डांबरीकरण व रेल्वे स्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह येथील रस्त्याचे पुनर्रडांबरीकरण करणे.
२) दीपाली हॉटेल ते जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्याचे काँक्रीटिंग करणे व रेल्वे स्टेशन उड्डाणपूल येथील रस्त्याचे पुनर्रडांबरीकरण.
३) पुंडलीकनगर जलकुंभ ते सिडको एन-३, एन-४ मधील हायकोर्ट ते कामगार चौक मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटींग करणे.
४) भवानी पेट्रोलपंप सिडको एन-२ ते सी-सेक्टर मुख्य रस्ता ठाकरेनगर एन-२ रस्त्याचे काँक्रीटिंग करणे.
५) महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी रस्त्याचे काँक्रीटींग करणे.
६) अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साईज ऑफिस रस्त्याचे डांबरीकरण करणे.
७) जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रीटींग करणे
८) जळगाव रोड ते हॉटेल अजंता अंबेसेडर रस्त्याचे डांबरीकरण करणे
९) महर्षि दयानंद चौक ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण करणे.