निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

By Admin | Published: June 11, 2014 12:41 AM2014-06-11T00:41:04+5:302014-06-11T00:52:21+5:30

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

50 crores for the supply of water from semi-urban areas | निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

googlenewsNext

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
निमशहरी भागाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षे राबविला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी जिल्ह्यास पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत निमशहरी म्हणून घोषित केलेल्या गावांमध्ये मागणीनुसार पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात एकूण ४९ गावे ही निमशहरी म्हणून घोषित झालेली आहेत. त्यातील २२ गावे ही महानगरपालिका हद्दीलगतची आणि उर्वरित २७ गावे ही नगरपालिका हद्दीलगतची आहेत. निमशहरांची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
या ठिकाणी काही दिवसांत पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. उर्वरित ९ गावांमध्येही ग्रामपंचायतींकडून अर्ज आल्यास ही योजना राबविली जाऊ शकते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, निमशहरी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर तिथे नळांना मीटर बसविले जाणार
आहेत.
शिवाय या पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचे आणि विजेचे आॅडिट करण्याची संकल्पनाही अमलात येणार आहे. योजना अस्तित्वात आल्यानंतर नियमितपणे वीज आणि पाण्याच्या वापराचे एमजीपीमार्फत आॅडिट केले जाईल.
नगरपालिकेलगतच्या निमशहरी ग्रामपंचायती
सिल्लोड नगरपालिका : पिंप्री, डोंगरगाव, भवन, मोढा खुर्द
कन्नड नगरपालिका : अंधानेर, हिवरखेडा गौ, ब्राह्मी, गराडा
खुलताबाद नगरपालिका : सराई, शूलिभंजन, खिर्डी सालुखेडा
पैठण नगरपालिका : कावसान, दक्षिण, उ. जायकवाडी, तांदूळवाडी, पटेगाव, दादेगाव ज., दादेगाव जुने, सायगाव, वडवाळी, वाघाडी, पंतेवाडी, तेलवाडी, चनकवाडी,
वैजापूर नगरपालिका : वैजापूर ग्रा. १, वैजापूर ग्रा. २
गंगापूर नगरपालिका : सिद्धपूर
वाड्या-वस्त्यांनाही पाणीपुरवठा
जलस्वराज्य-२ योजनेअंतर्गत पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्यात येणार आहेत. मागील पाच वर्षांपासून उन्हाळ्यात ज्या वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असेल अशा सर्व वाड्या- वस्त्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
आतापर्यंत लहान वाड्या-वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली जात नव्हती; मात्र आता या नवीन योजनेमुळे त्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे.
या योजनेत केवळ नगरपालिका हद्दीलगतच्या निमशहरी गावांचाच समावेश आहे.
जिल्ह्यात २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाऊ शकणार आहेत; मात्र आतापर्यंत केवळ १८ गावांनीच यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केले
आहेत.

Web Title: 50 crores for the supply of water from semi-urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.