मैदानावरील ५० लाख लिटर पाण्याचा निचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:34 AM2017-08-22T00:34:45+5:302017-08-22T00:34:45+5:30
महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागला़ परंतु पावसामुळे स्टेडीयमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागला़ परंतु पावसामुळे स्टेडीयमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़
श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे विकास कामास २०१४ मध्ये सुरूवात झाली होती़ स्टेडिमयच्या मैदानाचे विकास कामे टप्या- टप्याने करण्यात येत होते़ विकेट ब्लॉक ५, सरावासाठी विकेट ८, तुषार व पाणी निचरा व्यवस्थापनाची कामे पुर्णत्वाला आली आहेत़
स्टेडियमवरील व्हीआयपी पॅव्हेलियन, अर्दन माऊंट, ३५ हजार प्रेक्षक गॅलरीचे कामे यापूर्वीच पूर्ण झाले असून क्रिकेट मैदानाचे कामही पूर्ण झाले आहे़ हैदराबाद व नागपूर येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या धर्तीवर येथील मैदानाचे काम करण्यात आले आहे़
कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती़ परंतु शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने स्टेडिमयच्या मैदानावर तळे साचले़
त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेल्या या मैदानाचे नुकसान झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता़ यासंदर्भात स्टेडिमय व्यवस्थापक रमेश चौरे यांनी सांगितले, मुसळधार पावसाने मैदानावर पाणी साचले असले तरी हे पाणी पूर्णत: बाहेर निघून गेले़ साधारणपणे सात ते आठ तासात मैदान कोरडे झाले़
या पावसामुळे पाणी निचरा व्यवस्थापनाचे जे काम केले होते, त्याचा प्रत्यक्षात अनुभव आला़ जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा व्यवस्थीत निचरा होवून मैदान पूर्ववत झाले़
मैदानाचे किंवा येथील कोणत्याही कामाचे नुकसान झाले नाही़ या स्टेडियमवर आता रणजीसह आंतराष्ट्रीय दर्जाचे एकदिवसीय व कसोटीचे क्रिकेट सामने खेळले जाऊ शकतात़