जिल्ह्यात ५० लाखांचा उडाला बार
By Admin | Published: October 25, 2014 11:26 PM2014-10-25T23:26:40+5:302014-10-25T23:49:42+5:30
सोमनाथ खताळ , बीड दिवाळी म्हटलं की, उत्साह, रोषणाई, फटाक्यांचा ठो ठो आवाज. सर्वत्र आनंदाचे वातावरण.. मात्र यावर्षीची दिवाळीत फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाने दगा दिल्याने
सोमनाथ खताळ , बीड
दिवाळी म्हटलं की, उत्साह, रोषणाई, फटाक्यांचा ठो ठो आवाज. सर्वत्र आनंदाचे वातावरण.. मात्र यावर्षीची दिवाळीत फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाने दगा दिल्याने आणि खरीपाची पीके हातची गेल्याने शेतकऱ्यांपासून ते व्यापारापर्यंत याचा परिणाम दिसून आला. उसनवारीवरच शेतकऱ्यांनी आपली दिवाळी साजरी केली.े यावर्षी सुमारे ५० लाख रूपयांच्या फटाक्यांचा बार उडाला.
यावर्षीची दिवाळी झाली मात्र त्यावर पावसाने दगा दिल्याचा परीणाम साफ दिसून येत होता. दरवर्षी फटाक्यांमध्ये कोटींची उलाढाल होत असते मात्र यावर्षी हा बार केवळ ५० लाखाच्या आसपासच उरकला. मागील दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत.
लहानांपासून ते थोरापर्यंतचे, वाड्या-वस्त्यांपासून ते शहरापर्यंतचे सर्वचजण दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. फटाके फोडल्यानंतर घरी बनविलेल्या गोडधोड जेवणावर ताव मारला जातो. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही यावर्षीची गोड पदार्थ तिखट लागत होता.नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीकही हातून गेले. प्रत्येकवर्षी दिवाळीचा सण हा कापसाच्या पहिल्या वेचणीवर साजरा केला जात होता.
मात्र पावसाअभावी कपाशीचे पिकही गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले. याचा परीणाम दिवाळीच्या सणावर साफ दिसून आला. कपड्यापासून ते फटाक्यापर्यंतची उलाढाल यावर्षी केवळ लाखातच आटोपली.
दरम्यान, कपडे, किराणा, सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीमध्ये देखील याचा परिणाम दिसून आला़ निवडणुकांमुळे दिवाळीतील व्यवहार आधीच लांबणीवर पडले होते़ त्यानंतर मात्र व्यापारपेठ गजबजली होती़