मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

By विकास राऊत | Published: December 27, 2023 03:13 PM2023-12-27T15:13:13+5:302023-12-27T15:13:24+5:30

बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

50 percent of Marathwada's cities face water crisis; A tanker will be required for drinking water | मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सरत्या वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे ७६ पैकी ३८ शहरांवर फेब्रुवारी-मार्च २०२४ नंतर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होणार आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळविली आहे. बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

जून २०२४ पर्यंत १९ शहरांना तर ८ शहरांना जुलै २०२४ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. ६ शहरांना एप्रिल-मे अखेरपर्यंत, १२ शहरांना मार्च अखेरपर्यंतच पाणीपुरवठा होऊ शकेल. फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ शहरांना पाणी देता येणार आहे. तर ४ शहरांना जानेवारीअखेरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. दोन शहरांचे स्त्रोत आटले आहेत. ६ शहरांना येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होईल.

१ कोटी लोकांची तहान कशी भागणार?
२०११च्या जनगणनेनुसार मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यातील सुमारे ७६ लाख लोकसंख्या शहरी भागात २०११ नुसार आहे. परंतु सध्या लोकसंख्या २ कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. शहरी लोकसंख्येचा टक्का ५० टक्के असणे, शक्य असून सुमारे १ कोटीहून अधिक लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या उन्हाळ्यात भेडसावेल.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय शहरे.......किती दिवस पाणी पुरणार
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर.........वर्षभर पुरेल

वैजापूर..........जानेवारी २०२४
सिल्लोड------जून २०२४
पैठण---------जून २०२४
कन्नड--------जानेवारी २०२४
गंगापूर..............फेब्रुवारी २०२४
खुलताबाद..........मार्च २०२४
फुलंब्री..............फेब्रुवारी २०२४
सोयंगाव..............एप्रिल २०२४

जालना जिल्हा
जालना शहर..........सध्या पाणीसाठा आहे

अंबड.................एप्रिल २०२४
परतूर................ मार्च २०२४
भोकरदन...........जलस्त्रोतांमध्ये पाणी नाही
बदनापूर.............मार्च २०२४
घनसावंगी..........फेब्रुवारी २०२४
जाफ्राबाद............फेब्रुवारी २०२४
मंठा.................फेब्रुवारी २०२४
तीर्थपुरी............मार्च २०२४

परभणी जिल्हा...................
मानवत.........मार्च २०२४
पाथरी.............फेब्रुवारी २०२४
सेलू..............फेब्रुवारी २०२४
पालम............फेब्रुवारी २०२४
पूर्णा..................फेब्रुवारी २०२४
सोनपेठ...........फेब्रुवारी २०२४
जिंतूर.................फेब्रुवारी २०२४
गंगाखेड..............फेब्रुवारी २०२४

हिंगोली जिल्हा...............
हिंगोली..............जुलै २०२४
वसमत.............जुलै २०२४
कळमनुरी............जुन २०२४
औंढा नागनाथ...........जुन २०२४
सेनगाव...............जुन २०२४

नांदेड जिल्हा..................
कंधार...................जुलै २०२४
कुंडलवाडी............जुलै २०२४
किनवट.............जुलै २०२४
देगलूर...............नोव्हेंबर २०२४
धर्माबाद..............जुलै २०२४
बिलोली..................मे २०२४
लोहा..............फेब्रुवारी २०२४
उमरी...............मार्च २०२४
हदगाव.............पाण्याचा स्त्रोत नाही
भोकर...........जून २०२४
मुखेड................जून २०२४
मुदखेड............नोव्हेंबर २०२४
अर्धापूर.........जून २०२४
माहूर.................मार्च २०२४
हिमायतबाग.........जून २०२४
नायगाव...............जून २०२४

बीड जिल्हा............................
बीड..................फेब्रुवारी २०२४
अंबाजोगाई...........जून २०२४
परळी...................जून २०२४
गेवराई...................जून २०२४
माजलगाव...............फेब्रुवारी २०२४
धारूर.................जुलै २०२४
केज................जुलै २०२४
आष्टी.............जुलै २०२४
पाटोदा...............एप्रिल २०२४
शिरूरकासार............जानेवारी २०२४
वडवणी..............मे २०२४

लातूर जिल्हा........................
उदगीर.......................जून २०२४
अहमदपूर..................जून २०२४
निलंगा.......................जून २०२४
औसा....................जून २०२४
चाकूर....................जून २०२४
शिरूरअनंतपाळ..........मार्च २०२४
देवणी.......................मार्च २०२४
जळकोट................मार्च २०२४
रेणापूर................मार्च २०२४

धाराशिव जिल्हा.............
धाराशिव................मे २०२४
तुळजापूर.................जून २०२४
नळदुर्ग..................जून २०२४
उमरगा................जून २०२४
मुरूम..................फेब्रुवारी २०२४
कळंब................मार्च २०२४
भूम..................जानेवारी २०२४
परंडा.................फेब्रुवारी २०२४
वाशी....................फेब्रुवारी २०२४
लोहारा..............फेब्रुवारी २०२४

सरते वर्ष कमी पावसाचे
मराठवाड्यात यंदा १५ टक्के कमी पाऊस झाला. नांदेड, हिंगोली वगळता कुठेही समाधानकारक पाऊस नाही. अवकाळी पावसाने डिसेंबरमध्ये हजेरी लावली. त्याचा फारसा परिणाम जलसाठा होण्यावर झाला नाही. मोठ्या ११ जलप्रकल्पांसह मध्यम व लघु ८६६ प्रकल्प, बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या शहर, गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

योजनांवर निर्णयच होत नाही...
मराठवाडा वॉटरग्रीडवर निर्णय होत नाही. सरकार चर्चेला वेळ देत नाही. नवीन योजनांचा विचार नाही. कमी पाऊस पडल्याने ३७ टक्केच जलसाठा प्रकल्पांमध्ये आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात शहरांसह ग्रामीण भागात पाणीटंचाई भीषण असणार आहे.
-डॉ.शंकर नागरे, माजी सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

Web Title: 50 percent of Marathwada's cities face water crisis; A tanker will be required for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.