चोरीला गेलेले ५० टक्के मोबाइल शोधले सायबर क्राइम सेलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:50 PM2017-11-12T23:50:03+5:302017-11-12T23:50:06+5:30

जानेवारीपासून आॅक्टोबरअखेरपर्यंत चोरीला गेलेल्या एकूण मोबाइलपैकी पन्नास ते साठ टक्के मोबाइल शोधून काढण्यात सायबर क्राइम सेलच्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना यश आल्याचे समोर आले.

 50 percent of the stolen mobile searches have been detected by cyber crime cell | चोरीला गेलेले ५० टक्के मोबाइल शोधले सायबर क्राइम सेलने

चोरीला गेलेले ५० टक्के मोबाइल शोधले सायबर क्राइम सेलने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाइल चोरी होण्याच्या घटना रोज घडत असतात. जानेवारीपासून आॅक्टोबरअखेरपर्यंत चोरीला गेलेल्या एकूण मोबाइलपैकी पन्नास ते साठ टक्के मोबाइल शोधून काढण्यात सायबर क्राइम सेलच्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना यश आल्याचे समोर आले.
गेल्या काही वर्षांपासून मोबाइलची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोबाइल न वापरणारा व्यक्ती सापडणे आता अवघडच झाले आहे. बाजारातील विविध कंपन्या रोज नवीन मॉडेल लाँच करतात. नवीन फीचर्स असलेला मोबाइल खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. महागडे मोबाईल घेतल्यानंतर तो सांभाळून ठेवणेही तेवढेच जिकिरीचे काम आहे. कारण शहराच्या वेगवेगळ्या भागांत रोज सतत मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत.
जानेवारीपासून ते आॅक्टोबरअखरेपर्यंत चोरट्यांनी सुमारे ६६० हून अधिक मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी ३३० गुन्ह्यांची नोंद विविध ठाण्यांत करण्यात आलेली आहे. मोबाइल चोरीची फिर्याद नोंदवून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी मोबाइल ट्रेसिंग करण्यासाठी चोरीला गेलेल्या मोबाइलच्या आयएमईआय नंबरची माहिती सायबर क्राइम सेलकडे पाठवितात. बºयाचदा एकाच गुन्ह्यात दोन ते पाच मोबाइल चोरीचे गुन्हे असतात.
आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत दाखल विविध गुन्ह्यांतील चोरीला गेलेल्या ६६० मोबाइलचे आयएमईआय नंबर ट्रेसिंगकरिता सायबर क्राइम सेलला प्राप्त झाले होते. सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी विविध मोबाइल कंपन्यांकडे पत्र पाठवून संबंधित मोबाइलचा आयएमईआय नंबर आॅल इंडिया स्तरावर ट्रेसिंगकरिता लावण्याचे कळविले होते. चोरीला गेलेल्या मोबाइलपैकी ३३० हॅण्डसेट ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले. हे मोबाइल कोठे आहेत आणि कोण वापरत आहे, त्या वापरकर्त्याचे नाव आणि पत्ता पोलिसांनी शोधून काढला. त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना कळविली. यातील २०० मोबाइल हॅण्डसेट आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

Web Title:  50 percent of the stolen mobile searches have been detected by cyber crime cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.