औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:33 PM2019-06-07T17:33:26+5:302019-06-07T17:39:05+5:30

जिल्ह्यातील १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरचे पाणी

50% of the population of Aurangabad district suffers from drinking water | औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

googlenewsNext
ठळक मुद्देसरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने पाणीपुरवठा  

औरंगाबाद : जिल्ह्यातील हजार दोन हजार नव्हे, तर तब्बल १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या सरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने जिल्ह्यातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५० टक्के लोकसंख्या पाण्यासाठी व्याकूळ असून, आता दमदार पावसाळ्याची प्रतीक्षा आहे. 

३७ लाखांच्या आसपास जिल्ह्याची लोकसंख्या आहे. यातील ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मध्यम, लघु प्रकल्प आटले असून, टँकरशिवाय ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नाही. ७३८ गावे आणि २६९  वाड्यांवर पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे. ५३६ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. 
औरंगाबाद तालुक्यातील १३७ गावांतील ४ लाख ६ हजार ३७२ नागरिकांना १९४ टँकर, फुलंब्री तालुक्यातील ६८ गावांतील १ लाख ८५ हजार ९१६ नागरिकांना ११४ टँकर, पैठण तालुक्यातील ९८ गावांतील २ लाख ५१ हजार ६७१ नागरिकांना १३६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

गंगापूर तालुक्यातील १४५ गावांतील २ लाख ६४ हजार ५७२ नागरिकांना १७७ टँकर, वैजापूर तालुक्यातील १२५ गावांतील २ लाख १४ हजार ८१२ नागरिकांना १८५ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३३ गावांतील ९० हजार ५४४ नागरिकांना ५० टँकर, कन्नड तालुक्यातील ५९ गावांतील १ लाख २९ हजार ४५५ नागरिकांना ८३ टँकर, सिल्लोड तालुक्यातील ९६ गावांतील ३ लाख २० हजार ५८० नागरिकांना १९४ टँकरने, तर सोयगाव तालुक्यातील ७ गावांतील १५ हजार ८२ नागरिकांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

तालुकानिहाय टँकर
तालुका    टँकर
औरंगाबाद    १९४
फुलंब्री    ११४
पैठण    ९८
गंगापूर    १७७
वैजापूर    १८५
खुलताबाद    ५०
कन्नड    ८३
सिल्लोड    १९४
सोयगाव    १३
एकूण    ११४६

Web Title: 50% of the population of Aurangabad district suffers from drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.