यूपीएससीला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 03:39 PM2020-10-05T15:39:58+5:302020-10-05T15:40:24+5:30
केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्यातीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.
औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्यातीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे बोलले जात आहे.
महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली ३२ केंद्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. सर्व केंद्रांवर पोलीसांच्या निगराणीत आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून परीक्षा पार पडली. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस विभाग व अन्य विभागांचे सुमारे ११०० अधिकारी, कर्मचारी परीक्षेसाठी तैनात होते. पहिल्या सत्रात ५ हजार ५८६ तर दुपारच्या सत्रात ५ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.