नोकरांनीच लांबवले ५० हजारांचे कापड
By Admin | Published: June 19, 2014 12:41 AM2014-06-19T00:41:33+5:302014-06-19T00:52:31+5:30
सिल्लोड : शहरातील महावीर कलेक्शनचे मालक राजेश खिंवसरा हे कुटुंबासह विदेश दौऱ्यावर गेल्याची संधी साधून दुकानातील नोकरांनी दुकानामधून पँट पीस, शर्ट पीस असे विविध ५० हजार रुपयांचे कापड लंपास केले.
सिल्लोड : शहरातील महावीर कलेक्शनचे मालक राजेश खिंवसरा हे कुटुंबासह विदेश दौऱ्यावर गेल्याची संधी साधून दुकानातील नोकरांनी दुकानामधून पँट पीस, शर्ट पीस असे विविध ५० हजार रुपयांचे कापड लंपास केले.
दुकानमालक आपल्या कु टुंबासह दि. ३१ मे ते १४ जूनपर्यंत विदेश दौऱ्यावर गेले होते. दुकानाचे काम त्यांची वयोवृद्ध आई बघत होती. याचा फायदा घेत आरोपींनी दुकानातील विविध नामांकित कंपन्यांचे कापड संगनमत करून लंपास केले. दुकानमालक विदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. दुकानमालक राजेश गोकुलचंद खिंवसरा यांच्या फिर्यादीवरून आरोपी ईश्वर आनंदा सांगळे, रा.आव्हाना, ता.भोकरदन, सय्यद युसूफ अल्ताफ, रा.पिंपळगाव पेठ, अमोल त्रिंबक पांडे, विलास रमेश बोराडे, दोघे रा.मंगरूळ, ता.सिल्लोड यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आबा आव्हाड करीत आहेत.
दरम्यान, यातील ईश्वर आनंदा सांगळे, अमोल त्रिंबक पांडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी चोरलेले कापड कोणाला विकले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या चोरी प्रकरणातील आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग
महावीर कलेक्शनमध्ये सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यात आलेले आहेत. आरोपींनी नामांकित कंपन्यांचे पँट पीस व शर्ट पीस अशा विविध कापडांची चोरी करताना कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये येऊ नये असा प्रयत्न केला; परंतु नकळत ते चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. विदेश दौऱ्याहून आल्यानंतर दुकानमालकाने सीसीटीव्हीचे फुटेज तपासले तेव्हा सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आरोपी कै द झाल्याने त्यांचे बिंग फुटले.