पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:58 AM2022-06-06T11:58:22+5:302022-06-06T12:00:01+5:30

चारित्र्यावर संशय ठरला घातक; प्रेमविवाह केलेल्या पतीने वृद्धावस्थेकडे झुकल्यानंतर संशयावरून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

50-year-old wife murdered on suspicion; The husband locked the house and fled | पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या

पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या

googlenewsNext

औरंगाबाद : दारू पिऊन ५० वर्षांच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीने घरातील दगडी खलबत्त्याने पत्नीच्या डोक्याचा चेंदामेदा केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता राहुलनगर येथे उघडकीस आली. खून केल्यानंतर पती मृतदेहाशेजारीच मोबाइल ठेवून फरार झाला. त्याच्या शोधासाठी सातारा ठाण्याचे दोन, गुन्हे शाखेचे एक पथक तैनात केले आहे.

बिलकीस उर्फ मीना (५०) असे मृत महिलेचे आणि आरोपी पतीचे मच्छिंद्र पिराजी पिटेकर (५५, रा.राहुलनगर) नाव आहे. सातारा पोलीस ठाण्यात मीनाची मुलगी शमा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मच्छिंद्रला दारूचे प्रचंड व्यसन आहे. दारू पिऊन तो सतत पत्नीस शिवीगाळ व मारहाण करीत होता. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. शमा यांनी वडिलांना समजावून सांगितल्यानंतर, त्या घरी निघून गेल्या. बिलकीस या मुलगी शमासह एका हॉटेलवर कामाला होत्या. सकाळी शमा यांनी कामावर जाण्यास निघाल्यानंतर, आईच्या घराचे गेट उघडून आत पाहिले असता, घराला कुलूप होते. तेव्हा त्यांना आई आपल्या अगोदर कामाला गेली असल्याचे वाटले.  हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिलकीस दिसल्या नाहीत. त्यामुळे शमा यांनी स्वत:ची मुलगी मुस्कानला पाठविले. मुस्कानने घरी जाऊन कुलूप तोडून पाहिले असता, बिलकीस रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी
शहरात मध्यरात्रीच खुनाची एक घटना समोर आली होती. सकाळी ८ वाजता दुसरी घटना समोर आल्यामुळे उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक देविदास शेवाळे, सर्जेराव सानप आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पथकही दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.

बिलकीस यांचा दुसरा विवाह
बिलकीस यांचा मच्छिंद्र पिटेकर हा दुसरा पती आहे. बिलकीस यांना दोन विवाहित मुली, एक मुलगा आहे. मुलगा हा नगर येथे मजुरीचे काम करतो. बिलकीस आणि तिचा दुसरा पतीही मोलमजुरी करत होते. प्रेमविवाह केलेल्या पतीने वृद्धावस्थेकडे झुकल्यानंतर संशयावरून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: 50-year-old wife murdered on suspicion; The husband locked the house and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.