50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:04 PM2019-07-20T12:04:44+5:302019-07-20T12:29:56+5:30

अपोलो ११ या अवकाशयानाने फ्लोरिडातील केप केनेडी स्पेस सेंटर येथून १६ जुलै १९६९ रोजी चंद्राच्या दिशेने झेप घेतली.

50 years of Moon Landing | 50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी

50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी

googlenewsNext

अपोलो ११. चंद्राचे द्वार माणसाला खुले करून देणारी मोहीम! अंतराळातील इतर ग्रहावर प्रथमच माणसाचे पाऊल पडले. अवघ्या विश्वाने ही ऐतिहासिक घटना डोळ्यात साठवली. चंद्रावर अमेरिकेचा ध्वज फडकावून नील आर्मस्ट्राँग, एडविन अल्ड्रिन सुखरूप पृथ्वीवर परतले. २० जुलै १९६९ रोजी हे यान चंद्रावर पोहोचले. तब्बल सहा तासांनंतर म्हणजे २१ जुलैच्या पहाटे आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. 

अपोलो ११ या अवकाशयानाने फ्लोरिडातील केप केनेडी स्पेस सेंटर येथून १६ जुलै १९६९ रोजी चंद्राच्या दिशेने झेप घेतली. दोन तास ३३ मिनिटे हे यान पृथ्वीच्या कक्षेत होते. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडण्यासाठी यानाला लागणाºया वेगासाठी एस-आयव्हीबी इंजिन पुन्हा प्रज्वलित करण्यात आले. केनेडी स्पेस सेंटरमधून नील आर्मस्ट्राँग, एडविन अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तिघांसह ‘अपोलो ११’ हे अवकाशयान १६ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. हे अवकाशयान उड्डाणानंतर १९ जुलै रोजी चंद्राच्या कक्षेत फिरू लागले.

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन अ‍ॅल्ड्रिन चंद्रावर उतरणाºया ‘ईगल’मध्ये बसले आणि हे ईगल मूळ यानापासून वेगळे झाले. यानात तिसरा अंतराळवीर कॉलिन्स थांबून होता आणि हे यान पृथ्वीप्रदक्षिणा करीत होते. तब्बल दोन तास नऊ मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावरील ‘सी आॅफ ट्रँक्विलिटी’ या पूर्वनियोजित जागेवर उतरले. त्यानंतर सुमारे सहा तासांनी म्हणजे २१ जुलैच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास ‘ईगल’चा दरवाजा उघडून शिडीच्या पायºया उतरून नील आर्मस्ट्राँगचे पहिले पाऊल चंद्राच्या भूमीवर पडले. त्याच्या पायाचे ठसेही चंद्रावर उमटले. त्यानंतर १९ मिनिटांनी अ‍ॅल्ड्रिनही आर्मस्ट्राँगला येऊन मिळाला. दोघांनी फोटो काढले. चंद्रावरील पृष्ठभागाचे नमुने घेतले आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज चंद्रावर रोवला. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचार्ड निक्सन यांच्याशी हॉस्टन केंद्राच्या माध्यमातून दोघांनी संपर्कही साधला. दोघांनी २२ तास चंद्रावर घालविले. नंतर ‘ईगल’मधून त्यांनी अवकाशयानाकडे कूच केली. अवकाशयानात पोहोचताच ‘ईगल’ला सोडून कॉलिन्ससह तिघांनीही पृथ्वीकडे झेप घेतली. ११ हजार ३२ मीटर प्रति सेकंद या वेगाने हे यान पृथ्वीच्या कक्षेत आले आणि एक इतिहास रचत अलगद प्रशांत महासागरात उतरले. 

चंद्राबाबत...
चंद्र कक्षेत प्रवेश
फ्रँक बोरमन 
(१९२८) अपोलो ८
विलियम ए. अँडर्स 
(१९३३) अपोलो ८
जेम्स ए. लोव्हेल (ज्यू.) 
(१९२८) अपोलो ८, अपोलो १३
थॉमस स्टेफर्ड 
(१९३०) अपोलो १०
मायकेल कॉलिन्स 
(१९३०) अपोलो ११
रिचार्ड एफ. गोर्डन 
(ज्यू.) (१९२९-२०१७) अपोलो १२
फ्रेड डब्ल्यू. हेज (ज्यू.) 
(१९३३) अपोलो १३
जॉन एल. स्वीगर्ट (ज्यू.) 
(१९३१-१९८२) अपोलो १३
स्ट्यूअर्ट ए. रुसा 
(१९३३-१९९४) अपोलो १४
अल्फ्रेड एम. वॉर्डन 
(१९३२) अपोलो १५
थॉमस के. 
मॅटिंगली सेकंड 
(१९३६) अपोलो १६
रोनाल्ड ई. इव्हान्स 
(१९३३-१९९०) अपोलो १७

Web Title: 50 years of Moon Landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा