"शासन आपल्या दारी' साठी तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यकांना १२ हजार रुपयांचे टार्गेट"
By बापू सोळुंके | Published: May 26, 2023 08:10 PM2023-05-26T20:10:34+5:302023-05-26T20:11:54+5:30
विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्या ट्विटने खळबळ
छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथे शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त लोकांना आणण्यासोबतच तहसीलदारांकडून ५० हजार, कृषी सहायकास १२ हजार रुपये तर तलाठ्यांना ६ हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते, असा आरोप खळबळजनक विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी केला.
आ. दानवे यांनी याविषयीचे एक ट्विट समाजमाध्यमावर केले आहे.शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती सामान्य जनतेला देण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला. शुक्रवारी कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड,पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाविषयी दानवे यांनी समाजाध्यमावर एक पोस्ट टाकली.
'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी 'तनाने-धनाने' मदत केली. लोकं आणण्याशिवाय प्रत्येक तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यक १२ हजार आणि तलाठ्याला ६ हजार रुपये देण्याचे 'आदेश' सुटले होते. हे लाभार्थी वर्षभरापासून या मदतीच्या प्रतीक्षेत होते. (१/२)
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 26, 2023
त्यांच्या ट्विटवर हण्डलवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी 'तनाने-धनाने' मदत केली. लोकं आणण्याशिवाय प्रत्येक तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यक १२ हजार आणि तलाठ्याला ६ हजार रुपये देण्याचे 'आदेश' सुटले होते. हे लाभार्थी वर्षभरापासून या मदतीच्या प्रतीक्षेत होते.