‘बामुक्टो’च्या रजा आंदोलनात ५०९ प्राध्यापक सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 06:45 PM2018-09-13T18:45:57+5:302018-09-13T18:47:28+5:30
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ११५ महाविद्यालयातील ५०९ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
औरंगाबाद : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम.फुक्टो.) सलग्न डॉ. बााबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालय महासंघ (बामुक्टो) विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्राध्यापक भरतीसाठी मंगळवारी (दि.११) सामूहिक रजा आंदोलन केले. त्यात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ११५ महाविद्यालयातील ५०९ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
प्राध्यापक भरती सुरु करण्यासह जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना समान काम समान वेतन, कोर्टाच्या आदेशानुसार तक्रार निवारण समितीची स्थापना आदी मागण्यांचा समावेश आहे. हे आंदोलन राज्यभारत राबविण्यात आले. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुदानित ११५ महाविद्यालयातील तब्बल ५०९ प्राध्यापकांनी सामूहिक रजा घेत आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. याविषयी माहिती शिक्षण संचालक कार्यालयाच्या आदेशाने विभागीय कार्यालयाने जमा केली आहे. ही माहिती राज्य सरकारच्या अवलोकनार्थ पाठविण्यात आल्याचे उच्च शिक्षण विभागाने सांगितले.