वरद मंदिरात ५१ कुंडी गणेश याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:05 AM2021-02-11T04:05:56+5:302021-02-11T04:05:56+5:30
मंदिरात दि.१२ ते १५ फेबुवारीदरम्यान गणेश जयंती साजरी होणार आहे. १२ रोजी सकाळी शांतीपाठाने सुरुवात होईल. ५१ यजमान ५१ ...
मंदिरात दि.१२ ते १५ फेबुवारीदरम्यान गणेश जयंती साजरी होणार आहे. १२ रोजी सकाळी शांतीपाठाने सुरुवात होईल. ५१ यजमान ५१ कुंडी गणेश यागला बसतील.
१४ फेबुवारीला दुपारी १२ वाजता गणेश यागची सांगता होईल. अकोला येथील नाथशक्तिपीठाचे समर्थ नरेंद्रनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील. १५ फेबुवारीला गणेश जयंती साजरी होईल. सकाळी अथर्वशीर्ष पठण करण्यात येईल. १० वाजता गणेश जन्माचे कीर्तन मनोहर बुवा दीक्षित महाराज करणार आहे. दुपारी १२ वाजता मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वरद गणेशसाठी सुवर्णजडीत सिंहासन अर्पण करण्यात येईल. यावेळी प्रसाद अमळनेरकर महाराज यांची विशेष उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचा लाभ भविकांनी घ्यावा, असे आवाहन गणेश सभेचे अध्यक्ष मनोज पाडळकर यांनी केले.
चौकट
भक्ती गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव
सिडको एन १ येथील भक्ती गणेश मंदिरात १४ फेबुवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीगणेश याग (सहस्त्र मोदक हवन) करण्यात येणार आहे. १५ फेबुवारी रोजी गणेश जयंती सोहळ्याला सकाळी ९.३० वाजता श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रवर्तन. दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्मोत्सव, दुपारी ३ वाजता श्री सत्यविनायक पूजा व सायंकाळी ६ वाजता प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.