सैन्यभरतीसाठी ५१ हजार उमेदवारांची नोंदणी...!

By Admin | Published: May 6, 2017 12:22 AM2017-05-06T00:22:35+5:302017-05-06T00:26:19+5:30

सैन्यभरतीसाठी ५१ हजार उमेदवारांची नोंदणी...!

51 thousand candidates registered for the recruitment of the army! | सैन्यभरतीसाठी ५१ हजार उमेदवारांची नोंदणी...!

सैन्यभरतीसाठी ५१ हजार उमेदवारांची नोंदणी...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील नऊ जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी जालन्यात २७ एप्रिल पासून सैन्यभरतीची प्रक्रिया सुरु आहे. भरतीसाठी नोंदणी केलेल्या ५१ हजार उमेदवारांपैकी जवळपास ३० हजार उमेदवारांनी भरती प्रक्रि येमध्ये सहभाग नोंदविला असल्याची माहिती सैन्य विभागाच्या भरती विभागाचे महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्याचे प्रमुख ब्रिगेडियर दिनेश चड्डा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी औरंगाबाद विभागाच्या भरतीप्रकियेचे संचालक कर्नल एम. पी. सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्रिगेडियर चड्डा म्हणाले की, राज्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, जालना, जळगाव, औरंगाबाद, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरती प्रकियेत धुळे येथील ३ हजार ५०० उमेदवारांनी सहभाग नोंदवला तर हिंगोली व परभणी ङ्क्त ३ हजार ३००, नांदेड व नंदुरबार ३ हजार ६२६ २६ , औरंगाबाद ङ्क्त ७ हजार, जालना ङ्क्त३ हजार ९५९, बुलडाणा ङ्क्त ७ हजार तर जळगाव जिल्ह्यातील उमेदवांरासाठी ६ व ७ मे रोजी
भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करत ब्रिगेडियर चड्डा यांनी या भरती प्रक्रियेमध्ये जिल्हा प्रशासनाची मोलाची मदत झाली असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाचे त्यांनी आभारही व्यक्त केले.
दरम्यान, सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची निवास व्यवस्था नसल्याने मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे.
उन्हामुळे शारीरिक व मैदानी चाचणी मध्यरात्रीनंतर होत आहे. मात्र आलेल्या उमेदवारांसाठी एक ते दोन मंडप उभारण्यात आलेले आहे. त्याचा काही फायदा उमेदवारांना होत नाही. जिल्हा सैनिक कार्यालयाने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी अल्पदरात भोजनालय सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
क्रीडा संकुलापासून हॉटेल अथवा ढाबे दूर आहेत. त्यामुळे क्रीडा संकुल परिसरात सैनिक कार्यालयाने अल्प दरात भोजनालय सुरू केल्यास उमेदवारांना त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक उमेदवारांनी शाळा, महाविद्यालयांत मुक्काम ठोकला आहे. उन्हाच्या तीव्रतेने उमेदवार त्रस्त आहेत.

Web Title: 51 thousand candidates registered for the recruitment of the army!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.