५१ युवकांचा नेत्रदान संकल्प
By Admin | Published: February 21, 2016 11:49 PM2016-02-21T23:49:20+5:302016-02-21T23:53:42+5:30
सेनगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील युवकांनी एकत्र येवून आदर्श असा नेत्रदानाचा निर्णय २१ फेब्रुवारी रोजी घेतला
सेनगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील युवकांनी एकत्र येवून आदर्श असा नेत्रदानाचा निर्णय २१ फेब्रुवारी रोजी घेतला असून जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या उपस्थितीत त्या अनुषंगाने ५१ युवकांनी नेत्रदानाचा विहित नमुन्यातील संमती अर्ज भरून दिला.
येथील जि. प. प्रशालेचा प्रांगणात रविवारी शिवजयंती समितीच्या वतीने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक आकाश कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, मनसे जिल्हा सविच संदेश देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाशराव देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी विजयकुमार येवले, नामदेव येवले, रमेश कुटे, गंगाराम गाडे, माधव गाडे, रामराव देशमुख, वैभव गाडेकर, शंकर पदमे, महेश बेंबडे, जगन्नाथ तावरे, सचिन देशमुख, प्रकाशराव देशमुख, कैलास साबू, गोपाल साबू, अशोकराव सरनाईक, शालीक तिडके, डॉ. मंगेश टेहरे, संदीप देशमुख, विलास खाडे, द्वारकादास सारडा, सखाराम देशमुख, डॉ. सुभाष गिते, डॉ. श्याम जाधव, नागेश कोटकर, नामदेवराव कोटकर, डॉ. नारायणदास तोष्णीवाल, गंगाबाई तोष्णीवाल, द्वारकादास येवले, प्रशांत देशमुख, महारुद्र तोडकरी, डॉ. अमर काळबांडे, प्रविण महाजन, हारफुल वर्मा, ओकांरेश्वर कोटकर, अनिल महाजन, किसन डांगे, रमेश तोडकर, भारत लोखंडे, प्रशांत महाजन, छत्रुघ्न कोरडे, गणेश कोरडे, अनिल मगर, शिरीष तोष्णीवाल, राजकुमार देशमुख, जगदीश देशमुख, निलेश तिडके, बाबाराव होडबे, उमेश देशमुख, मुकेश देशमुख, गजानन उफाड आदींनी मरणोत्तर नेत्रदान संमती अर्ज भरून दिला. (वार्ताहर)