वेरुळच्या सामुदायिक सोहळ्यात ५५ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:04 AM2018-05-13T01:04:58+5:302018-05-13T01:05:24+5:30
धमार्दाय आयुक्त मुंबई व धर्मादाय सहआयुक्त औरंगाबाद यांच्या आवाहनानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय संस्थाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात शनिवारी दुपारी १२ वाजता तब्बल ५५ जोडपी विवाहबद्ध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद/वेरुळ : धमार्दाय आयुक्त मुंबई व धर्मादाय सहआयुक्त औरंगाबाद यांच्या आवाहनानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय संस्थाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात शनिवारी दुपारी १२ वाजता तब्बल ५५ जोडपी विवाहबद्ध झाली.
निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी ( मौनगिरीजी ) महाराज आश्रम वेरुळ येथे हा सोहळा दहा हजार वºहाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने उत्तराधिकारी समाजरत्न श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाहाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. विवाहासाठी येणाऱ्या वधू, वर व दहा हजार वºहाडाला आश्रमाच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले. या सोहळ्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली होती. लग्न लावण्यासाठी पैठण येथील ब्रह्मवृंदांनी मंगलाष्टके व धार्मिक विधी पार पाडल्याची माहिती समितीचे संयोजक राजेंद्र पवार यांनी दिली.
कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, १०८ महंत स्वामी सेवागिरीजी महाराज, स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज, भिक्खू सागरबोधी बुद्धभूमी मावसाळा, भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, रांजणगाव, भन्ते शाक्यपुत्र धम्मबोधी, भिक्खू चरण, आ. प्रशांत बंब, माजी आ. अण्णासाहेब माने, आ. संजय शिरसाठ, शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड, माजी उपमहापौर राजू शिंदे, जे.के. जाधव, दामूअण्णा नवपुते, सुभाष पाटील, धमार्दाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, धमार्दाय उपायुक्त विवेक सोनुने, एस. व्ही. कादरी, समाधान मुळे, प्रकाश पाटील, महेंद्र दगडफोड , मच्छिंद्र मातकर, दामूअण्णा गवळी, गणपत म्हस्के, जनार्दन रिठे, मनोहर गावडे, पोलीस पाटील रमेश ढिवरे, शेकनाथदादा होळकर, जनार्दन आधाने, बाळासाहेब गवळी यांच्यासह जिल्ह्यातील विविध धार्मिक संस्थानचे संत, महंत, अनेक शासकीय अधिकारी, संस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सोहळा समिती अध्यक्ष आ. संदीपान भुमरे, उपाध्यक्ष दीपक अग्निहोत्री, सचिव दयाराम बसैये बंधू, सहसचिव नृसिंह उर्फ राजू कुलकर्णी, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते, संयोजक राजेंद्र पवार, सहसंयोजक रामानंदजी महाराज, सहसंयोजक के. बी. भामरे, सदस्य कैलास जाजू , मिठ्ठू बारगळ, शंकर बोरुडे, कल्याणचंद मुनोत, बाळासाहेब औताडे, काकासाहेब जोरे, उत्तमराव मनसुटे, रंगनाथ गवळी, सुभानराव देशमुख, प्रदीपकुमार खंडेलवाल, गोविंद प्रधान, सूर्यभान खांबेकर आदींनी परिश्रम घेतले.
दोन दिव्यांग जोडप्यांचेही शुभमंगल
या सोहळ्यात गणेश आसाराम शिंदे (औरंगाबाद), प्रतिमा त्र्यंबक सावंत (परभणी) व युवराज इंद्रसिंग करपे (घटांब्री) व लक्ष्मी तुकाराम हिवाळे (औरंगाबाद) हे दोन दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. या विवाहासाठी औरंगाबाद सिडको येथील रेणुका माता मंदिरातर्फे सर्वात जास्त १८ विवाहाच्या नोंदी करण्यात आल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.
विवाह सोहळयाआधी सकाळीच आश्रमाच्या वतीने नवरदेवांची मिरवणूक काढण्यात आली होती. विवाहबद्ध होणाºया जोडप्यांना समितीच्या वतीने संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.