५५ हजारांवर विद्यार्थी वंचित
By Admin | Published: June 13, 2014 11:54 PM2014-06-13T23:54:46+5:302014-06-14T01:20:18+5:30
बीड : ग्रामीण भागातील अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी केंद्र शासनाने शिष्यवृत्ती देऊ केली होती.यामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ९३ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे
बीड : ग्रामीण भागातील अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी केंद्र शासनाने शिष्यवृत्ती देऊ केली होती.यामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ९३ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. नोंदणी मात्र ६० हजार ७७ विद्यार्थ्यांची झाली होती.
२०१३-१४ या शैक्षणिक सत्रात केंद्र शासनाच्या वतीने ‘आम आदमी’ शिष्यवृत्ती देऊ केली होती. ग्रामीण भागातील अल्प भूधारक व पाच एकर जिरायती तसेच अडीच एकर बागायती असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने आम आदमी शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे़ यासाठी बीड जिल्हयात संजय गांधी निराधार योजना विभागाला ६० हजार विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करत संजय गांधी निराधार विभागाने ६० हजार ७७ विद्यार्थ्यांची नोंदणी केली व केंद्र शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी केली़ यामध्ये जिल्ह्यातील ६६२ शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली होती़
आम आदमी शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे राज्यात सर्वात जास्त काम बीड जिल्हयात झाले होते़ मात्र झालेल्या एकूण नोंदणी पैकी अत्यल्प विद्यार्थ्यांना आम आदमी शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याचे प्राप्त अहवालानुसार निदर्शनास आले आहे़ प्राप्त अहवालानुसार बीड तालुक्यातील ७ हजार ५९९, पाटोदा-३४२१, आष्टी- ६३००, शिरूर- ४१०६, गेवराई- ५७६१, वडवणी- २६००, अंबाजोगाई- ५३००, परळी- ४८८३, माजलगाव-४३२५, धारूर- २४२५ व केज-७५०० विद्यार्थ्यांची आम आदमी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली होती़ याबाबत संजय गांधी निराधार विभागातील कर्मचारी भरत भंडाले यांनी सांगितले की, काही डाटस एंन्ट्री च्या सिस्टिममध्ये
बाराशे रूपये दिले जातात वर्षाकाठी
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून आम आदमी शिष्यवृत्ती अंतर्गत शंभर रूपये महिन्याला देण्याची योजना आहे़ मात्र साठ हजारातील केवळ पाच हजार ९३ विद्यार्थ्यांनाच लाभ मिळालेला आहे़ (प्रतिनिधी)
गोरगरिबांच्या मुलांची थट्टा
केंद्र सरकारने मोठ्या उदात्त हेतूने आम आदमी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. मात्र बीड जिल्ह्यातील ५५ हजाराहून अधिक विद्यार्थी या योजनांपासून वंचितच आहेत. जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या मोठी आहे, अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलांनाच मिळायला हवा. परंतु प्रशासनाने विद्यार्थ्यांची केवळ नोंदणी करून घेतली आहे. त्यांना शिष्यवृत्ती मिळालीच नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांची ही थट्टा असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हा प्रमुख शैलेश जाधव यांनी केला. शिष्यवृत्ती तात्काळ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.