सिल्लोड येथे मुस्लीम समाजाच्या सामूहिक सोहळ्यात ५५५ विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:59 AM2018-04-23T00:59:45+5:302018-04-23T01:00:50+5:30
मान्यवरांची उपस्थिती; आमदार अब्दुल सत्तार यांची कन्याही विवाहबद्ध
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : सिल्लोड येथे रविवारी मुस्लिम समाजाच्या सामूहिक सोहळ्यात तब्बल ५५५ विवाह लागले. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कन्येचा विवाह सुद्धा या सोहळ्यात झाला.
नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,
खा. चंद्रकांत खैरे, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. राजेश टोपे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. १४ वर्षापासून सिल्लोड येथे आ. सत्तार यांच्या संकल्पनेतून व नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. नवीन दाम्पत्यास संसारोपयोगी साहित्य देण्यात येते.