आकाशवाणी चौकात दररोज सायंकाळी ६ ते ८ एकेरी वाहतूक
By | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:27+5:302020-11-29T04:04:27+5:30
जालना रोडवर सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २१ नोव्हेंबरपासून ...
जालना रोडवर सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २१ नोव्हेंबरपासून आकाशवाणी चौकातील सिग्नल प्रायोगिक तत्वावर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बंद ठेवण्यात येत आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी फुटल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे यापुढेही आकाशवाणी चौकात सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत वाहतूक सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे, याविषयीची अधिसू्चना शनिवारी पोलीस आयुक्तांनी जारी केली. त्रिमूर्ती चौकाकडून महेशनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मोंढानाका पुलाखालून यू-टर्न घ्यावा आणि महेशनगरकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी सेव्हन हिल पुलाखालून मार्गक्रमण करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले.