औरंगाबाद जिल्ह्यातील ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:49 PM2020-09-03T15:49:13+5:302020-09-03T15:49:47+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२१ झाली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने रोज मृत्यू होणे सुरूच आहे. जिल्ह्यातील ५ आणि जळगाव जिल्ह्यातील एक अशा सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी घाटी प्रशासनाने दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२१ झाली आहे.
अंधारी-सिल्लोड येथील ४८ वर्षीय पुरुष , असेगाव-गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुष, एन-९, सिडको येथील ६७ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, हिमायतबाग येथील २८ वर्षीय पुरुष, पाचोरा-जळगाव येथील ७१ वर्षीय पुरुष आणि चाळीसगाव- जळगाव येथील ६४ वर्षीय रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.