एकाच दिवसात ६ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:04 PM2019-03-31T23:04:38+5:302019-03-31T23:05:06+5:30

: मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाच्या सर्व नऊ वॉर्ड कार्यालयांनी रविवारी शेवटच्या दिवशी कंबर कसली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिजोरीत ५ कोटी ६३ लाख रुपये जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत हा आकडा ६ कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा करमूल्य निर्धारण विभागाचे प्रमुख महावीर पाटणी यांनी सांगितले.

6 crore recovery in one day | एकाच दिवसात ६ कोटींची वसुली

एकाच दिवसात ६ कोटींची वसुली

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च एण्ड : रात्री १२ पर्यंत वॉर्ड कार्यालये वसुलीसाठी सुरू


औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाच्या सर्व नऊ वॉर्ड कार्यालयांनी रविवारी शेवटच्या दिवशी कंबर कसली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिजोरीत ५ कोटी ६३ लाख रुपये जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत हा आकडा ६ कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा करमूल्य निर्धारण विभागाचे प्रमुख महावीर पाटणी यांनी सांगितले.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. २७ मार्चपर्यंत १०० कोटी ४७ लाख रुपयांचा कर वसूल झाला होता. त्यानंतर जोमाने कारवाई व वसुलीची मोहीम हाती घेत वर्षअखेरीस शेवटच्या दिवशी तब्बल ५ कोटी ५० लाखांचा कर वसूल झाला आहे. यामध्ये वॉर्ड क्र. १ कार्यालयांतर्गत १ कोटी ६० लाख, वॉर्ड क्र . २ मध्ये २४ लाख ८१ हजार, वॉर्ड क्र . ३ अंतर्गत ३० लाख २५ हजार, वॉर्ड क्र . ४ मध्ये २१ लाख ५२ हजार, वॉर्ड क्र . ५ मध्ये ११ लाख ४० हजार, वॉर्ड क्र. ६ मध्ये ३६ लाख १४ हजार, वॉर्ड क्र . ७ मध्ये ३६ लाख ९० हजार, वॉर्ड क्र. ८ मध्ये ५७ लाख ७१ हजार, वॉर्ड क्र . ९ मध्ये ५८ लाख ९ हजार ९९७ रुपये, असा एकूण १२६० मालमत्तांकडील ४ कोटी ३७ लाख १७ हजार रुपये कर वसूल झाला आहे. कर वसुली करताना थकीत कर न भरल्यामुळे सत्य विष्णू हॉस्पिटलला सील ठोकण्यात आले. त्यांच्याकडे १२ लाखांचा कर थकला आहे. वॉर्ड कार्यालयात कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी आणि सायंकाळी रांगा लागल्या होत्या. शिवाजीनगर वॉर्डात वसुली कॅम्पमध्ये नागरिकांची गर्दी उसळली होती. शहरातील वॉर्ड कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मोबाईल टॉवरच्या कर वसुलीची मोहीम राबविली. मागील वर्षापेक्षा ३० कोटींनी अधिक कर वसुली करण्यात आल्याचे पाटणी यांनी सांगितले.
३१ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सर्व वॉर्ड कार्यालये सुरू राहणार आहेत. सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये रोख रक्कम जमा राहणार आहे. या रकमेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वॉर्ड कार्यालयास एक सुरक्षा कर्मचारी दिला आहे.

Web Title: 6 crore recovery in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.