कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला ६० लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:07 AM2019-05-23T00:07:52+5:302019-05-23T00:08:16+5:30
खिशातील पैसे लावून महापालिकेतील विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांवर आज उपोषणाची वेळ आली आहे. सर्व मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये प्रशासनाने या कंत्राटदारांची दखलही घेतली नाही. उलट कंत्राटदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रशासनाने बंगळुरू येथील कचरा संकलन करणाºया कंपनीला तब्बल ६० लाखांचा धनादेश दिला.
औरंगाबाद : खिशातील पैसे लावून महापालिकेतील विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांवर आज उपोषणाची वेळ आली आहे. सर्व मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये प्रशासनाने या कंत्राटदारांची दखलही घेतली नाही. उलट कंत्राटदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रशासनाने बंगळुरू येथील कचरा संकलन करणाºया कंपनीला तब्बल ६० लाखांचा धनादेश दिला.
रमजान ईद साजरी करण्यासाठी थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी सोमवारपासून मनपातील कंत्राटदारांनी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. सध्या उष्णतेची लहर आहे. तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये काही कंत्राटदारांची प्रकृतीही खालावली आहे. प्रशासनाने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाही तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येणार आहेत. तिजोरीत पैसे नसल्याचे नाट्य प्रशासनाकडून रंगविण्यात येत आहे. नगररचना विभागाकडून मिळणाºया उत्पन्नासाठी स्वतंत्र बँक खाते उघडे आहे. या खात्यात ६० कोटींहून अधिक रक्कम पडून आहे. याशिवाय शासनाकडून प्राप्त होणारी रक्कम गृहीत धरल्यास मनपा प्रशासनास किमान १०० कोटी रुपयांची देयके अदा करता येतील. पण त्यासाठी इच्छाशक्तीच नाही.
१ कोटी ५६ लाखांचे बिल
शहरातील सहा झोन कार्यालयांमध्ये बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीकडून कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. मागील तीन महिन्यांत केलेल्या कामाचे बिल कंपनीने सादर केले. १ कोटी ५६ लाखांचे बिल कंपनीने मनपाला दिले. त्यातील ६० लाख रुपये मनपाने कंपनीला अदाही केले. मागील दीड वर्षापासून बिलांसाठी उंबरठे झिजविणाºया कंत्राटदारांना भर उन्हात उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
------------