६० रुग्ण होम आयसोलेटेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:23+5:302021-03-07T04:06:23+5:30
होम आयसोलेशनच्या नावावर काही खासगी रुग्णालयांनी चक्क व्यवसायच सुरू केला होता. रुग्णाला संबंधित डॉक्टर आम्ही सकाळ-संध्याकाळी काळजी घेऊ असे ...
होम आयसोलेशनच्या नावावर काही खासगी रुग्णालयांनी चक्क व्यवसायच सुरू केला होता. रुग्णाला संबंधित डॉक्टर आम्ही सकाळ-संध्याकाळी काळजी घेऊ असे लेखी स्वरूपात आश्वासन देत होते. अशीच हमी महापालिकेच्या आरोग्य विभागालाही देण्यात येत होती. एका रुग्णाकडून किमान १० ते १५ हजार रुपये फी घेण्यात येत होती. अजूनही शहरातील काही खासगी रुग्णालये अशाच पद्धतीने होम आयसोलेशनसाठी परवानगी देत आहेत. आठ दिवसांपूर्वी शहरात होम आयसोलेशनच्या रुग्णांची संख्या फक्त ३० होती. आता ती ६० पर्यंत पोहोचली आहे. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले की, महापालिकेकडून यापूर्वी आयसोलेशन पद्धत बंद करण्यात आली होती. परिस्थितीनुसार हळूहळू काही रुग्णांना परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णांकडे राहण्यासाठी मोठे घर आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र रूम आहे, त्यांनाच परवानगी दिली जात आहे.