जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:52 PM2019-05-07T23:52:55+5:302019-05-07T23:53:10+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी ...

60 percent of rural areas in the district are drought-hit | जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

googlenewsNext
ठळक मुद्देजायकवाडी मृतसाठ्यात : १६ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण


औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. १६ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. १०५० टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.
जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर १६ मध्यम प्रकल्पांत २.२० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. ९३ लघु प्रकल्पांतही अत्यल्प पाणीसाठी शिल्लक आहे. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ४२८ जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. १५ छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ४१२ जनावरांची संख्या आहे. सिल्लोडमध्ये १७९, गंगापूर तालुक्यात १६६, वैजापूर तालुक्यात १५६ टँकरने, तर औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी शासनाने ५९ लाख ७९ हजार ९०५ रुपये इतके अनुदान दिले आहे. ७५ टक्के रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच छावणी संयोजकांना अनुदानाची मागणी करता येणार आहे.
४७४ विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यातील ४७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२७ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. ३९४ विहिरी गावांतील आहेत. २५८ वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील पावणेतीन लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. फुलंब्रीतील दीड लाख, पैठण सव्वादोन लाख, गंगापूर अडीच लाख, वैजापूर दोन लाख, खुलताबाद ८५ हजार , कन्नड २ लाख, सिल्लोड तीन लाख, सोयगाव तालुक्यातील १५ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे.

Web Title: 60 percent of rural areas in the district are drought-hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.