जिल्ह्यात खरिपाची ६० टक्के पेरणी

By Admin | Published: July 2, 2017 12:18 AM2017-07-02T00:18:16+5:302017-07-02T00:21:34+5:30

नांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

60 percent sowing of Kharif in the district | जिल्ह्यात खरिपाची ६० टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपाची ६० टक्के पेरणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त अहवालानुसार ३३ टक्के पेरणी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात पेरणीचा आकडा ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत गेला आहे़
जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात खरीप ज्वारीसाठी १ लाख १२ हजार ३०० हेक्टर, उडीद-५० हजार ३०० हेक्टर, मूग-२९ हजार ९०० हेक्टर, तूर- ६९ हजार ८०० हेक्टर, सोयाबीन-१ लाख ९९ हजार हेक्टर तर कापसासाठी ३ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. त्यापैकी ज्वारी १५ हजार ८०० हेक्टर, उडीद १४ हजार ४०० हेक्टर, मूग १० हजार ९०० हेक्टर, तूर २० हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १ लाख १० हजार १०० हेक्टर तर कापसाची १ लाख ६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
तालुकानिहाय पेरणी अशी नांदेड- २८०० हेक्टर १० टक्के, लोहा- ४३ हजार १०० हेक्टर ५० टक्के, भोकर- २०९०० हेक्टर ३० टक्के, देगलूर- ३३ हजार ९०० हेक्टर ७० टक्के, मुदखेड- १४ हजार ९०० हेक्टर ६० टक्के, हिमायतनगर- ९४०० हेक्टर ३० टक्के, नायगाव- २२ हजार १०० हेक्टर ५० टक्के, तालुक्यात ९ हजार ९०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. असा पेरणीचा अहवाल कृषी विभागाकडे असला तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र जास्त हेक्टरवर झाली आहे.
मात्र आजपर्यंत बिलोली-३७ हजार ५०० हेक्टर ११० टक्के, मुखेड-०० कंधार-१७ हजार हेक्टर ३० टक्के, हदगाव-००, कनवट-३६ हजार ६०० हेक्टर ४० टक्के, माहूर-०० धर्माबाद-२१ हजार ७०० हेक्टर ७० टक्के, उमरी -०० तर अर्धापूर तालुक्यात १७ हजार ८०० हेक्टरवर ८० टक्के एवढी पेरणी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी विभागाच्या अहवालापेक्षा जास्त हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
गतवर्षी समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामात ३० जून पर्यंत कृषी विभागाच्या अहवालानुसार ४ लाख ४७ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. एकूण क्षेत्राच्या ५४ टक्के प्रमाण होते. तालुकानिहाय- नांदेड तालुका-१८ हजार हेक्टर (५६.४२) टक्के, अर्धापूर- ९६०० हेक्टर (४२.२९) टक्के, मुदखेड-१५७०० हेक्टर (६६.६८) टक्के, लोहा-५६ हजार ९०० हेक्टर (६५.४३) टक्के, कंधार-४५ हजार ५०० हेक्टर ७०.२१ टक्के, देगलूर-३५ हजार ६०० हेक्टर ७८.६८ टक्के, मुखेड- ००, नायगाव-२२ हजार २०० हेक्टर ४६.८३ टक्के, बिलोली-३८ हजार ३०० हेक्टर ११५ टक्के, धर्माबाद-२५ हजार ३०० हेक्टर ८१.८१ टक्के, किनवट-६० हजार १०० हेक्टर ७३ टक्के, माहुर-३१ हजार २०० हेक्टर ५१.६६ टक्के, हदगाव-४३ हजार ३०० हेक्टर ५१.८१ टक्के, हिमायतनगर-१५ हजार ३०० हेक्टर ४०.५८ टक्के, भोकर-२२ हजार ६०० हेक्टर ३४.३५ टक्के, उमरी- ६६०० हेक्टर २२.५२ टक्के याप्रमाणे पेरणी करण्यात आली होती.

Web Title: 60 percent sowing of Kharif in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.