संशयामुळे ६० टक्के संसार दुभंगताहेत !

By Admin | Published: May 18, 2017 12:08 AM2017-05-18T00:08:49+5:302017-05-18T00:17:20+5:30

लातूर : महिला व बाल सहाय्यता केंद्रात दाखल झालेल्या ४२५ प्रकरणांपैकी ६० टक्के म्हणजे २५५ पती-पत्नीचा संसार संशयामुळे दुभंगण्याच्या मार्गावर आहे़

60 percent of the world are suspicious of the suspicion! | संशयामुळे ६० टक्के संसार दुभंगताहेत !

संशयामुळे ६० टक्के संसार दुभंगताहेत !

googlenewsNext

राजकुमार जोंधळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : महिला व बाल सहाय्यता केंद्रात दाखल झालेल्या ४२५ प्रकरणांपैकी ६० टक्के म्हणजे २५५ पती-पत्नीचा संसार संशयामुळे दुभंगण्याच्या मार्गावर आहे़ तर व्यसनामुळे २५ टक्के म्हणजे १०६, इतर कारणांमुळे १५ टक्के अर्थात ६४ जणांचे संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत़ मात्र त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न समुपदेशनाने केला जात आहे़
जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१७ या २८ महिन्यात एकूण ४२५ कौटुंबिक वादाची प्रकरणे केंद्राकडे दाखल झाली. यातील २४९ प्रकरणात तडजोड झाली आहे. तर ८२ प्रकरणात कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल असून, ७० प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयात खटले दाखल झाली आहेत. उर्वरित ९ प्रकरणात सध्या सुनावणी सुरु आहे. गांधी चौक पोलीस ठाण्यात जिल्हाभरातून दाखल होणाऱ्या कौटुंबिक वादाच्या प्रकरणात समुपदेशन केले जाते. वादामुळे बेजार झालेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाचेही इथे समुपदेशन केले जाते. बहुतांश वादाच्या प्रकरणात शुल्लक कारण हे अधिक जबाबदार असते. प्रारंभी मानपान, एकमेकांना समजुन न घेता होणारा संवाद हेच वादाला तोंड फोडते. परिणामी, यातून एकमेकांच्या भावना, मानपान सांभाळून घरात वावरल्यास वादावर चौकटीतच पडदा पडू शकतो.(अधिक वृत्त हॅलो/२वर)

Web Title: 60 percent of the world are suspicious of the suspicion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.