औरंगाबाद जिल्ह्यात ६,०११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; मृतांची संख्या ८३३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 02:14 PM2020-09-17T14:14:11+5:302020-09-17T14:16:03+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २२,६५१ रुग्ण कोरोनामुक्त

6,011 corona patients undergoing treatment in Aurangabad district; Death toll rises to 833 | औरंगाबाद जिल्ह्यात ६,०११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; मृतांची संख्या ८३३ वर

औरंगाबाद जिल्ह्यात ६,०११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; मृतांची संख्या ८३३ वर

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९,४९५ झाली आहे.बुधवारी २८७ नवे रुग्ण वाढले; ९ जणांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २८७ नव्या रुग्णांची भर पडली, तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजारांवर गेली आहे.

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या २८७ रुग्णांत ग्रामीण भागातील ११९, मनपा हद्दीतील ६०, सिटी एंट्री पॉइंटवरील ११ आणि अन्य ९७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९,४९५ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २२,६५१ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८३३ झाली आहे, तर आजघडीला ६,०११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मनपा हद्दीतील १२१ आणि ग्रामीण भागातील १०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ताकपूर, पैठणमधील ६५ वर्षीय महिला, विष्णूनगर, जवाहर कॉलनीतील ७८ वर्षीय पुरुष, मिलकॉर्नर येथील ५० वर्षीय महिला, जटवाडा, हर्सूल येथील ५५ वर्षीय महिला, गंगापुरातील ५० वर्षीय पुरुष, एन-बारा, हडकोतील ५६ वर्षीय पुरुष, एन-सहा येथील ६० वर्षीय महिला, नवीन शांतिनिकेतन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, पोलीस मुख्यालय परिसरातील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील ११९ रुग्ण 
मनीषानगर, वाळूज २, वाळूज १, रांजणगाव १, विटावा १, मेन रोड, रांजणगाव १, गांधीनगर, रांजणगाव २, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव २, शिक्षक कॉलनी, रांजणगाव १, श्रीराम कॉलनी, रांजणगाव १, नवीन वडगाव, गंगापूर १, कायगाव, गंगापूर १, जामगाव, गंगापूर १, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर १, मांजरी गंगापूर १, चंद्रपालनगर, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर ४, दुर्गावाडी, वैजापूर १, शिवाजी चौक, वैजापूर १, समृद्धी पार्क, वैजापूर १, हिरादास गल्ली, वैजापूर १, इंदिरानगर, वैजापूर १, सुखशांतीनगर, वैजापूर १, गंगापूर रोड, वैजापूर १ माऊलीनगर, रांजणगाव १, बजाजनगर २, दहेगाव, गंगापूर ७, पाचोड, पैठण १, गांधी मैदान, वैजापूर १, देशपांडे गल्ली, वैजापूर १, बिडकीन, पैठण १, पैठण २, जैनपुरा, पैठण १, नवीन कावसान पैठण १, माधवनगर, पैठण १, रामनगर, पैठण १, परदेशीपुरा, पैठण १, पाचोड फाटा, पैठण १, इंदिरानगर, पैठण १, शिवराई, वैजापूर १, सरस्वती सो., बजाजनगर १, खांडसरी परिसर, कन्नड १, कोळवाडी, कन्नड १, दिनापूर, पैठण १, अंधारी १, औरंगाबाद १३, गंगापूर ११, कन्नड २२, वैजापूर १४, सोयगाव १.

सिटी एंट्री पॉइंट येथील ११ रुग्ण
कांचनवाडी १, जालाननगर १, कुंभेफळ २, विष्णूनगर १, बीड बायपास १, वसंतनगर १, एन-बारा, हडको १, आळंद, सिल्लोड १, हर्सूल १, पोलीस कॉलनी टीव्ही, सेंटर १. 

मनपा हद्दीतील ६० रुग्ण
एकतानगर, हर्सूल १, दिवाण देवडी १, सहारा वैभव, जाधववाडी १, शिवाजीनगर, गारखेडा परिसर १, शिवाजीनगर २, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर २, श्रेयनगर १, देवळाई चौक २, यशवंतनगर, बीड बायपास १, जुना सातारा ग्रामपंचायत परिसर १, एमआयटी कॉलेज परिसर १, आलमगीर कॉलनी १, मायानगर १, मल्हार चौक १, महेशनगर, आकाशवाणी २, स्नेहनगर २, छत्रपतीनगर, बीड बायपास १, पदमपुरा २, साई कॅम्पस १, कोटला कॉलनी ४, उस्मानपुरा १, बेगमपुरा ३, राजेशनगर १, सारा विहार १, मकाई गेटजवळ १, सिव्हिल हॉस्पिटल परिसर २, गारखेडा १, जटवाडा रोड २, एन-सात, अयोध्यानगर २, जयनगरी, बीड बायपास १, स्वप्ननगरी १, वेदांतनगर १, उल्कानगरी २, हनुमाननगर १, जाधववाडी १, विशालनगर, गारखेडा १, नंदीग्राम कॉलनी, गारखेडा १, विष्णूनगर १, एन-अकरा, गजानननगर १, सप्तश्रृंगीमाता मंदिर परिसर १, कृष्णानगर १, पैठण रोड, इटखेडा १, श्रीरंग सिटी, पैठण रोड १, टिळकनगर १, संदेशनगर १.

Web Title: 6,011 corona patients undergoing treatment in Aurangabad district; Death toll rises to 833

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.