शहरात दाखल होणारे ६१ नागरिक बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:04 AM2021-04-15T04:04:12+5:302021-04-15T04:04:12+5:30
झाल्टा फाटा २, नगर नाका १३, दौलताबाद टी पॉईंट १ जण बाधित निघाला. रेल्वे स्टेशन, विमानतळावर १८ बाधित औरंगाबाद ...
झाल्टा फाटा २, नगर नाका १३, दौलताबाद टी पॉईंट १ जण बाधित निघाला.
रेल्वे स्टेशन, विमानतळावर १८ बाधित
औरंगाबाद : पालिकेच्या आरोग्य विभागाने रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर मंगळवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यातील तब्बल १८ जण बाधित आढळले आहेत. या ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी केली जाते. बुधवारी १३९ प्रवाशांची तपासणी केली. त्यांचा अहवाल गुरुवारी सकाळी महापालिकेला प्राप्त होईल.
भगतसिंगनगर येथे पाण्याची प्रचंड टंचाई
औरंगाबाद : वाॅर्ड क्रमांक २ भगतसिंगनगर येथे मागील काही दिवसांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून काही नागरिकांना टँकरद्वारे पाणी देण्यात येते. त्यातही महापालिकेची मनमानी सुरू असते. वाॅर्डातील ९० टक्के नागरिक जार मागून तहान भागवतात. पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, त्याची किंचितही दखल घेण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जार आणणे फार कठीण जाणार आहे. महापालिकेने टँकरने तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बाळासाहेब मच्छिंद्र औताडे यांनी केली आहे.