जिल्ह्यात ६१ तलाठी सज्जे स्थापन होणार
By Admin | Published: July 17, 2017 11:27 PM2017-07-17T23:27:37+5:302017-07-17T23:30:54+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यात आता नव्याने महसुली तलाठी सज्जे वाढणार असून ही संख्या ४० पर्यंत जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यात आता नव्याने महसुली तलाठी सज्जे वाढणार असून ही संख्या ४० पर्यंत जाणार आहे. सज्जा पुनर्रचना कार्यक्रमात मंगळवारी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खानापुरे यांनी केले.
औंढा नागनाथ तालुक्यातील १२२ गावांसाठी सध्या २० तलाठी कामकाज पाहतात. सध्या तालुक्यात २७ सज्जे असून चार मंडळे आहेत. तलाठ्यांवरील कामाचा ताण करण्यासाठी राज्य पुनर्रचना समितीने तालुक्यात नवीन १३ तलाठी सज्जांची निर्मित्ती करण्याची शिफारस केली होती. हे तलाठी सज्जे गावाची लोकसंख्या भौगोलिक क्षेत्र, खातेदारांची संख्या व सध्या सज्जात निवडल्या जाणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर बानापुरे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोहन बोथीकर बैठक घेणार आहेत.
याच अनुषंगाने भरतीही होणार असल्याने भविष्यात तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.