अतिवृष्टीचे ६२ टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:05 AM2021-09-25T04:05:22+5:302021-09-25T04:05:22+5:30

सोयगाव : एकाच महिन्यात तीनवेळा अतिवृष्टीच्या विळख्यात सापडलेल्या सोयगाव तालुक्यात नुकसानीचे बाधित क्षेत्राचे ६२ टक्क्यांवर पंचनामे झाले आहेत. तालुक्यात ...

62% panchnama of excess rain completed | अतिवृष्टीचे ६२ टक्के पंचनामे पूर्ण

अतिवृष्टीचे ६२ टक्के पंचनामे पूर्ण

googlenewsNext

सोयगाव : एकाच महिन्यात तीनवेळा अतिवृष्टीच्या विळख्यात सापडलेल्या सोयगाव तालुक्यात नुकसानीचे बाधित क्षेत्राचे ६२ टक्क्यांवर पंचनामे झाले आहेत. तालुक्यात खरिपाच्या ३९ हजार ९८२ हेक्टरवरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या बाधित क्षेत्राचे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे हाती घेण्यात आले आहेत.

तहसीलदार रमेश जसवंत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पंचनामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात बाधित क्षेत्रापैकी १५ हजार ५६९ हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. अद्यापही पंचनाम्यांचे काम सुरु आहे. तालुक्यात लागवडी क्षेत्रापैकी ४२ हजार ७९८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली असून त्यापैकी अतिवृष्टी आणि ढगफुटीचा फटका ३९ हजार ९८२ हेक्टरला बसला आहे. १५ हजार ५६९ हेक्टरवरील १६७८५ बाधित शेतकऱ्यांचे विविध नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्याने उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी पंचनामा पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार जसवंत यांनी केले आहे.

सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली असून ३४ हजार ३३४ हेक्टरवरील कपाशी पिके अतिवृष्टीच्या संकटात बाधित झाली आहे. अतिवृष्टीच्या बाधित क्षेत्राचे १३ मे २०१५ आणि २५ जानेवारी २०१८ प्रमाणे काढण्यात आलेली राज्य आणि केंद्र शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे पंचनामे करण्यात येऊन ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांना हेक्टरी १८ हजार याप्रमाणे मदतीची बाधित शेतकऱ्यांना अपेक्षा लागून आहे.

------ नुकसान भरपाईसाठी सोयगावला तीन मोर्चे -----

तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि त्यापाठोपाठ शेतकऱ्यांच्या मोर्चात समाविष्ट होऊन हर्षवर्धन जाधव यांनीही तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाच्या विरोधात दंड थोपटले आहे. जाधव यांच्यानंतर माजी जि.प.च्या सदस्या संजना जाधव यांनीही बनोटी-गोंदेगाव मंडळातील बाधित गावांना भेटी दिल्याने तीन मोर्चे आणि एका पाहणी भेटीतून काय निष्पन्न होणार याचीही शेतकऱ्यांना उत्सुकता लागून आहे.

--- छायाचित्र ओळ : अतिवृष्टीच्या तडाख्यात कपाशी पिके आडवी पडलेली, दुसऱ्या छायाचित्रात घोसला शिवारातील खरडून गेलेल्या जमिनी.

240921\aur23soyp02.jpg~240921\img-20210923-wa0082.jpg~240921\img-20210923-wa0066.jpg

सोयगाव-घोसला ता सोयगाव शिवारात ढगफुटीच्या पावसात खरडून गेलेली शेती~सोयगाव-अतिवृष्टीच्या संकटात आडवी पडलेली कापशी पिके~सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसान

Web Title: 62% panchnama of excess rain completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.