मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:56 PM2023-03-20T12:56:41+5:302023-03-20T12:56:58+5:30

संपामुळे केवळ २ टक्केच झाले पंचनामे

62 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Due to the strike, only 2 percent of Panchnama was formed | मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू

मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते १८ मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ६२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात ११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

या पावसाने २१ जनावरांचा, तर सात नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. २२ नागरिक जखमी झाले. १९ मार्च रोजीच्या अहवालानुसार जिरायत ४२ हजार हेक्टर, बागायत १६ हजार ५५ हेक्टर, तर ३ हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेसात हजार हेक्टर, परभणी २४०० हेक्टर, हिंगोली ५ हजार, नांदेड २३ हजार ५५४ हेक्टर, बीड ११ हजार, लातूर जिल्ह्यात साडेअकरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

२०३२ शेतकरी झाले बाधित
६ ते १९ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील २ हजार ३२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात लातूर, नांदेड, हिंगोलीतील बाधित शेतकऱ्यांचे आकडे समोर आले आहेत. इतर जिल्ह्यांतील आकडे अद्याप समोर आलेले नाहीत.

संपाचा परिणाम : दोन टक्के पंचनामे
मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर आहेत. विभागातील ४५० मंडळांतील तलाठी, मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे प्राथमिक नुकसानीचा अहवाल ई-पाहणीच्या आधारे केला आहे. १४ मार्चपासून महसूल कर्मचारी संपावर आहेत. अद्याप संपावर तोडगा निघालेला नसून, संपाचा पंचनाम्यांवर परिणाम झाला आहे. ६२ हजार पैकी १३८४ हेक्टर म्हणजेच २.२२ टक्के पंचनामे एकूण नुकसानीच्या तुलनेत झाले आहेत.

Web Title: 62 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Due to the strike, only 2 percent of Panchnama was formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.