६२ हजार ग्रामस्थांनी केले श्रमदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 12:41 AM2017-06-01T00:41:10+5:302017-06-01T00:42:32+5:30
कळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले.
बालाजी आडसूळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले. पवार्तील ४५ दिवसांत उपरोक्त गावांतील ६२ हजार ७५० लोकांनी श्रमदान केले. श्रमदान व यंत्रसामुग्रीद्वारे तब्बल ३ लाख ७३ हजार ३१७ घनमिटर एवढे जलसंधारणाचे काम करण्यात आले आहे.
कळंब तालुका हा अनियमित पर्जन्याचा भाग. तालुक्याच्या अर्थकारणावर शेतीचा जीतका प्रभाव तीतकाच शेतीवर लहरी निसगार्चा प्रभाव आहे.यातच जलसिंचनाची कोणतीही शाश्वत साधने उपलब्ध नसल्याने या बेभरवशाच्या पावसावरच सर्वस्वी अवलंबून रहावे लागत होते. यातूनच बिघडलेल्या अर्थकारणामुळे मध्यंतरी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका म्हणूनही कळंबकडे पाहिले जात होते. अशा कठीण स्थितीत सिंचनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते.मोठ्या प्रकल्पासाठी ‘साइट’ नसल्याने भूउपचाराची लहान-मोठी कामे करून गावचा व गावशिवारातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा मुद्दा समोर आला. हाच धागा पकडून पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ पर्व दोनसाठी कळंब तालुक्याची निवड केली. यानंतर फाउंडेशनच्या वतीने याभागातील लोकजीवन, भौगोलिक स्थिती यांचा सखोल अभ्यास करून एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. फाउंडेशनचे विभागीय समन्वयक इरफान शेख, संतोष शिनगारे यांनी यासाठी क्षमता बांधणीचा, नेतृत्व विकासाचा व जलसाठवण तंत्राची शास्त्रोक्त ओळख करून देणारा वेगवेगळ्या टप्यावरील प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात राबवला.
यात जवळपास ७० गावातून चांगले जलदूत समोर आले. या टिमने गावा-गावात जलजागृती करून अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतल्याने कळंब तालुक्यात जलसंधारणाच्या नव्या चळवळीने उभारी घेतल्याचे चीत्र निर्माण झाले.