पोलिसांसाठी ६४ घरांची खरेदी
By Admin | Published: October 2, 2016 01:16 AM2016-10-02T01:16:25+5:302016-10-02T01:21:43+5:30
औरंगाबाद : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यात पोलीस आयुक्तांना यश आले आहे.
औरंगाबाद : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यात पोलीस आयुक्तांना यश आले आहे. म्हाडाच्या तीसगाव येथील वसाहतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी ६४ निवासस्थाने खरेदी करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीच्या बंदोबस्तासाठी शहरात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची या निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
औरंगाबाद शहर पोलीस दलात सुमारे ३५ पोलीस निरीक्षक, ८० सहायक निरीक्षक, फौजदार आणि ३५०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सिडको, क्रांतीचौक, पोलीस आयुक्तालयामागे स्वतंत्र वसाहत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या जुन्या वसाहती पाडून तेथे नवीन इमारती उभारण्यात येत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या मागे पोलिसांसाठी ५३२ निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. यासाठी शासनाने १३६ कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे.