जीवनदायी आरोग्य योजनेचा ६५ रुग्णांना लाभ
By Admin | Published: May 20, 2014 12:18 AM2014-05-20T00:18:04+5:302014-05-20T01:11:23+5:30
रेणापूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून रेणापूर तालुक्यातून ६५ लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाकडून उपयुक्त प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली.
रेणापूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून रेणापूर तालुक्यातून ६५ लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाकडून उपयुक्त प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांंधी जीवनदायी आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेचा लाभ कोणत्याही जिल्ह्यातील रुग्णाला राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात जावून या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया, पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, लहान बालकांवरील शस्त्रक्रिया, कॅन्सरची शस्त्रक्रिया, त्यावरील उपचार पद्धती, शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी शासनाकडून दीड-दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. वरील योजनेच्या लाभासाठी रुग्णाकडे विशिष्ट शिधापत्रिका असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी रेणापूर तालुक्यातून ६५ रुग्णांनी तहसील कार्यालयाकडे प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यात गुरलिंग शिंदे (तळणी), वामन सूर्यवंशी (व्हटी), बाबूराव खसे (आनंदवाडी), महादेव सूर्यवंशी (कामखेडा), रामदास विरकर (घनसरगाव), बाबासाहेब चव्हाण (जवळगा), दगडू नागरगोजे (वंजारवाडी), लक्ष्मीबाई माने (पोहरेगाव), सय्यद जलाल, श्रीहरी घुले (वंजारवाडी), गंगाराम सरणागीर, अंकुश घोडके (गरसुळी), राजाभाऊ भूमकर (कुंभारी), हरिभाऊ काळे, पांडुरंग चेपट (पोहरेगाव), राजकुमार यादव, भीमा उपाडे (पळशी), शिवाजी शिंदे, गजानन जाधव (पळशी), ज्ञानोबा आरदवाड (सुमठाणा), दादाराव होळकर (घनसरगाव), सुरेंद्र शिंदे (घनसरगाव), संतराम कलवले (पानगाव), चंद्रकांत उरगुंडे (रेणापूर), चाँदपाशा बावचकर (रेणापूर), रावसाहेब सारगे (रामवाडी), रमेश नरवटे (रेणापूर), विठ्ठल भोसले (सेलू), मुंजाजी जाधव (सुमठाणा), तुकाराम जाधव, बालाजी जाधव (सुमठाणा), काशीम शेख (पानगाव), निवृत्ती हरडे, जगन्नाथ गाडे (रेणापूर), काशीनाथ नागरगोजे (दवणगाव), नरसिंग जाधव, रामकिसन निवृत्ती, प्रल्हाद भोसले, राम फुले, देविदास विरकर, रोहिदास गायकवाड, महादू हुडे, अरविंद फुलारी, बाबूराव चावरे, महादेव कांबळे, संतराम राठोड, सिद्धेश्वर हरिदास, फुलचंद नागरगोजे, बब्रुवान सोळंके, वामन सोडगीर, शोभा घोडके, बालाजी देवकते, प्रभू भोसले, बाबूराव चामले, शिवाजी शिंदे, शिवाजी आकनगिरे, महादू मोटाडे, युवराज जाधव, नागोराव इंगळे, केरबा माने, रतन जाधव, ताहेर सय्यद, प्रल्हाद सिरसाट, अमीरसाब कोतवाल आदींनी रेणापूर तहसीलमधून त्यांना उपचारासाठी प्रमाणपत्र वितरीत केले. (वार्ताहर)