मराठवाड्यातील रेशन दुकानांवर होतोय ई-पॉसचा ६७ % वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:24 PM2018-04-30T17:24:46+5:302018-04-30T17:26:05+5:30
मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ११ हजार ४४१ पैकी ११ हजार ४३० रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत.
प्रत्येक कार्डधारकाचा योजनानिहाय डेटा या मशीनमध्ये अपलोड केला आहे. आधार इलेबल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीमच्या (एईपीडीएस) माध्यमातून २० लाख १२ हजार ९०१ (६७ टक्के ) कार्डधारकांनी धान्य प्राप्त केले आहे. विभागात विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ रेशनकार्डधारक असून, यापैकी आधार कार्ड जोडणी केलेल्या लाभधारकांची संख्या ३० लाख २२ हजार ९०१ आहे. मार्चअखेरपर्यंत २० लाख १२ हजार ९०१ लाभधारकांनी रेशन दुकानातून ई-पॉसद्वारे व्यवहार केले. मार्चअखेरपर्यंत सर्वाधिक ७४ टक्के व्यवहार हे नांदेड जिल्ह्यात झाले. जालना ७२ टक्के , उस्मानाबाद ७० टक्के , लातूर ६९ टक्के , बीड ६६ टक्के , हिंगोली ६६ टक्के , परभणी ६५ टक्के , औरंगाबाद ५२ टक्के , असे व्यवहारांचे प्रमाण आहे. नवीन प्रणालीद्वारे धान्य घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी अद्यापही धान्याचा काळाबाजार रोखणार कसा, असा प्रश्न मात्र कायम आहे.
मार्चअखेरची धान्य वाटपाची स्थिती
जिल्हा आधार जोडणी ई-पॉसचे व्यवहार
नांदेड ७०,६१२ ४,२२,५८१
जालना ३,२०,०६९ २,२९,६४८
उस्मानाबाद २,९८,८७१ २,०८,४३८
लातूर ५९,०५० २,४६,९७४
बीड २३,८९२ ३,४७,०४३
हिंगोली १,९०,४४९ १,२५,४८३
परभणी २,६७,८२३ १,७४,३६७
औरंगाबाद ४,९२,१३५ २,५८,३६७
एकूण ३०,२२,९०१ २०,२२,९०१