मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:35 PM2018-10-31T23:35:51+5:302018-10-31T23:36:57+5:30

मराठवाड्यात दुष्काळामुळे चाºयाची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे.

67 lakh animals in Marathwada are facing drought | मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

googlenewsNext
ठळक मुद्दे मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड : जानेवारीपर्यंत पुरेल इतका चारा विभागात
औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे चाºयाची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारीपर्यंत चारा पुरेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे जून २०१९ पर्यंत शेतकºयांना जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे आहेत. ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० टन इतका चारा लागतो.
जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाºयाची आवश्यकता असते. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणे शक्य आहे. जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच चारा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात मराठवाड्यात कमी पाऊस झाला. ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. ४१ तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. पावसाअभावी पिकांचे उत्पादन निम्म्यावर आले, शिवाय चाराही उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पशुधन
जिल्हा पशुधन
औरंगाबाद १० लाख ६७ हजार ४१२
जालना ६ लाख ९९ हजार २४
परभणी ६ लाख २२ हजार २००
बीड १२ लाख २४ हजार ७९८
लातूर ७ लाख ५२ हजार ४२६
उस्मानाबाद ७ लाख ३७ हजार ३४७
नांदेड ११ लाख ४४ हजार ७२५
हिंगोली ४ लाख ५९ हजार ६८०
एकूण ६७ लाख ६१२

Web Title: 67 lakh animals in Marathwada are facing drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.