मतदारयादीवर ६७ आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:12 AM2017-09-01T00:12:28+5:302017-09-01T00:12:28+5:30
महापालिका निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ६७ आक्षेप आले आहेत़ या सर्व आक्षेपांच्या निकालानंतर ७ सप्टेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ६७ आक्षेप आले आहेत़ या सर्व आक्षेपांच्या निकालानंतर ७ सप्टेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार आहे़
महापालिकेच्या २० प्रभागासाठी महापालिकेने १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीत ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार आहेत़ यामध्ये २० प्रभागात सर्वाधिक मतदार हे सिडको प्रभागात राहणार आहेत़ येथे तब्बल २९ हजार ३१५ मतदार आहेत़ तर सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्ऱ ११ हैदरबाग प्रभागात आहेत़ येथे केवळ १५ हजार ६३१ मतदार आहेत़ नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महापालिका हद्दीत प्रभागनिहाय याद्या करण्यात आल्या आहेत़ शहरातील ४ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर १९ रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती़ यादीवर २८ आॅगस्टपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते़ या कालावधीत एकूण ६७ आक्षेप प्राप्त झाल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.