छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?

By विकास राऊत | Published: November 13, 2023 04:43 PM2023-11-13T16:43:55+5:302023-11-13T16:45:32+5:30

येणाऱ्या काळात मतदार स्थलांतराचा व नवीन मतदार नोंदणीचा आकडा वाढेल.

69 thousand voters excluded from Chhatrapati Sambhajinagar district; Is your name on the list? | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?

छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात जिल्ह्यात ६९ हजार ५९० मतदारांची नावे वगळली आहेत. मतदारांची नावे विविध कारणास्तव यादीतून वगळले असून, नव्याने ३१ हजार ९८३ मतदारांची भर पडली आहे.

येणाऱ्या काळात मतदार स्थलांतराचा व नवीन मतदार नोंदणीचा आकडा वाढेल. जिल्ह्यातील ६९ हजार ५९० मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. येणाऱ्या काळात हा आकडा वाढेल.

मतदार वळण्याची कारणे काय?
स्थलांतर झालेल्या मतदारांसह दुबार नावे असणे, चुका असणे, दोन ठिकाणी मतदान असणे, या व इतर कारणांमुळे मतदारांची नावे वगळली आहेत.

३१ हजार ९८३ मतदारांची भर
३१ हजार ९८३ मतदारांची ११ महिन्यांत भर पडली आहे. जिल्ह्यात मतदार नाेंदणीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ८ लाख ४४ हजार ९९२ मतदार तिशीच्या आतील आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
विधानसभा...........................पुरुष ............स्त्री...........तृतीयपंथी......... एकूण

सिल्लोड........................१,७३,१९९............१,५४,३९२....००००............३,२७,५७९
कन्नड.........................१,६८,०२५............१,५०,८०७....०४................३,१८,८३६

फुलंब्री.........................१,७८,८५५............१,५९,६००.....०४..............३,३८,१५९
छत्रपती संभाजीनगर मध्य....१,६७,८७८.........१,५७,२५२......०३............३,२५,१३३

छत्रपती संभाजीनगर पश्चिम...१,८६,७७५.......१,६५,२५४......५६..........३,५२,०८५
छत्रपती संभाजीनगर पुर्व......१,६३,८१२.........१,५२,२५१......०९..........३,२०,५७२

पैठण..........................१,६०,१९९............१,४३,२७८........०५.........३,०३,४८२
गंगापूर....................१,७५,००२................१,५६,४०४.........१२.......३,३१,४२०

वैजापूर ..................१,६०,०७६................१,४४,३०३.........०१.......३,०४,३८०
एकूण...................१५,३८,०२१................१३,८३,५४३......९४.....२९,२१,६५८

१८ वर्षे पूर्ण झाली, नोंदणी केली का? ......
२०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदार नोंदणी करणे शक्य होणार आहे.

नोंदणी कशी कराल?....
व्हॉट्सॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करता शक्य आहे. तसेच, तहसील कार्यालयातही जाऊन नोंदणी करता येते. बीएलओशी संपर्क करूनही नोंदणी करता येते.

निवडणूक विभागाचे आवाहन.....
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ डिसेंबरपर्यंत राबविला जाईल. ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे ग्रामसभा घेतल्या असून, २ व ३ डिसेंबरला शिबिरे आयोजित केली आहेत. शिबिरांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे.
- जिल्हा निवडणूक विभाग, छत्रपती संभाजीनगर

Web Title: 69 thousand voters excluded from Chhatrapati Sambhajinagar district; Is your name on the list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.