औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

By विकास राऊत | Published: May 15, 2024 01:31 PM2024-05-15T13:31:41+5:302024-05-15T13:44:52+5:30

६३.०७ टक्के मतदान : १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी बजावला हक्क

7 lakh 60 thousand 670 voters not casting vote in Aurangabad Lok Sabha constituency | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६३.०७ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. २०१९ च्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी मतदान घटले आहे. मतदारांमधील निरुत्साह, पोलचिट न मिळणे, मतदान केंद्र बदलणे, यादीत नाव नसणे, स्थानिक नागरी समस्यांकडे राजकीय नेते लक्ष देत नसल्याच्या रागाचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्का घटल्याचे दिसते आहे. सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मतदारांनी ‘हॉलिडे एंजॉय’ केल्याचेदेखील बोलले जात आहे. प्रशासनाने मतदान वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले; परंतु मागील निवडणुकीपर्यंतचा टक्काही गाठता आला नाही.

महिलांचे मतदान ५ टक्क्यांनी कमी
६५.८६ टक्के म्हणजेच १० लाख ७७ हजार ८०९ पैकी ७ लाख ९ हजार ८१६ पुरुष मतदारांनी मतदान केले.
६०.०१ टक्के म्हणजेच ९ लाख ८१ हजार ७७३ पैकी ५ लाख ८९ हजार १८४ महिला मतदारांनी मतदान केले.

५.८४ टक्के महिलांचे मतदान कमी झाले.
३ लाख ९२ हजार ५८९ महिलांनी मतदान केले नाही.
३ लाख ७६ हजार ९९३ पुरुष मतदारांनी मतदान केले नाही.

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
विधानसभा...................मतदानाची टक्केवारी........................किती वाढ / घट
२०२४...................................................२०१९..................................
कन्नड.............. ६६.७८................... ६४.८० टक्के...................... १.९८ टक्के घट
औरंगाबाद मध्य......... ६०.४०................... ६२.१९ टक्के............................ १.७९ टक्के घट
औरंगाबाद पश्चिम.......... ६०.५८.................. ६२.७८ टक्के....................... २.०२ टक्के घट
औरंगाबाद पूर्व........... ६१.११..................... ६२.८० टक्के........................ १.६९ टक्के घट
गंगापूर............ ६५.४४............................... ६५.८९ टक्के................. ०.४५ टक्के वाढ
वैजापूर .............. ६४.८०..................... ६२.०७ टक्के..................२...७३ टक्के घट
सरासरी.........६३.०७ टक्के...................एकूण ६३.४८ ....................०.४१ टक्के घट

गेल्या तीन निवडणुकांत किती झाले मतदान?
२००९ : ५१.५६ टक्के
२०१४ : ६१.०४ टक्के
२०१९ : ६३.४८ टक्के

२०१९ साली कशी होती मतदानाची स्थिती?
एकूण मतदार : १८ लाख ५९ हजार
झालेले मतदान: ११ लाख ९५ हजार ४४२
पुरुष : ९ लाख ७९ हजार ३२१
महिला : ८ लाख ७९ हजार ६७९
नवीन मतदार : १ लाख ९६ हजार ९६३
मतदान केंद्र : १८५

२०२४ साली असलेली मतदानाची स्थिती
एकूण मतदार : २० लाख ५९ हजार ७१०
झालेले मतदान: १२ लाख ९९ हजार ४०

पुरुष : १० लाख ७७ हजार ८०९
महिला : ९ लाख ८१ हजार ७७३

नवीन मतदार : १ लाख ११ हजार
मतदान केंद्र : २०४०

५ वर्षांत मतदारसंघातील बदल
मतदारसंघात २ लाख ७१० मतदार वाढले.
किती वाढले महिला मतदार ?: १ लाख २ हजार ९४

किती वाढले पुरुष मतदार? : ९८ हजार ४८८

२०१४ साली काय स्थिती होती?
२०१४ साली १५ लाख ३७ हजार ७०८ मतदार होते.
२०१९ साली १८ लाख ८६ हजार २९४ मतदार झाले.
३ लाख ४८ हजार ५८६ मतदार वाढले. मात्र त्या तुलनेत मतदान वाढले नव्हते.

६ लाख ५८ हजार १६७ पुरूष ....
५ लाख ३७ हजार ७० महिला मतदारांनी मतदान केले होते. .
मागील तीन निवडणुकींचा मतदानाचा आलेख
२००९ साली ९ लाख ७६ हजार ११० मतदान झाले होते. २००४ च्या तुलनेत १ लाख १३ हजार मतदान जास्त झाले होते.
२०१४ साली ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. २ लाख १९ हजार १३२ मतदान या निवडणुकीत जास्त झाले.
२०२४ साली १२ लाख ९९ हजार ४० मतदान झाले होते. २०१९ च्या तुलनेत १ लाख ३ हजार ७९८ मतदान वाढले.

Web Title: 7 lakh 60 thousand 670 voters not casting vote in Aurangabad Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.