ेसात हजार निराधारांची ऐन सणासुदीत उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:57 AM2017-09-20T00:57:20+5:302017-09-20T00:57:20+5:30

निराधार, परित्यक्त्या, अपंग, विधवा महिला, पुरूषांवर ऐन सणासदुीत उपासमारीची वेळ आली आहे.

7 thousand people starvation hunger in festivals | ेसात हजार निराधारांची ऐन सणासुदीत उपासमार

ेसात हजार निराधारांची ऐन सणासुदीत उपासमार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : निराधार, परित्यक्त्या, अपंग, विधवा महिला, पुरूषांवर ऐन सणासदुीत उपासमारीची वेळ आली आहे. तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा अािण आयसीआयसीआय बँकेचा मनमानी कारभार यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मागील सहा महिन्यांपासून तब्बल सात हजार निराधारांना मानधन मिळालेले नाही. निराधारांचे मानधन बँकेत येऊनही वेगवेगळी कारणे सांगून वाटप करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजनेतून निराधार, घटस्फोटित महिला, अपंग आदींना प्रति महा ६०० रुपये मानधन दिले जाते. परंतु मागील सहा महिन्यांपासून हे मानधन निराधारांना वाटप केलेले नाही. मानधनासाठी रोज हजारो निराधार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत, परंतु येथील अधिकारी, कर्मचारी उडवाउडवी व टोलवाटोलवी करून मानधनाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे.
दरम्यान, दसरा व दिवाळी सारखे आनंदाचे सण तोंडावर आले आहेत. यातच मानधन मिळाले नसल्याने निराधारांच्या आनंदावर प्रशासनाने एकप्रकारे विरजण टाकण्याचे काम केल्याचा गंभीर आरोपही निराधार करू लागले आहेत.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निराधारांचे मानधन द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: 7 thousand people starvation hunger in festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.