कानडीत ७० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:51 AM2017-09-11T00:51:10+5:302017-09-11T00:51:10+5:30
मंठा तालुक्यातील कानडी येथील अंदाजे ७० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : मंठा तालुक्यातील कानडी येथील अंदाजे ७० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. साठा भरण्याच्या तयारीत असलेली वाहने पथकास पाहून पळून गेली.
कानडी गावातील स्थानिक ट्रॅक्टरधारक कानडी-तळणी रस्त्यालगत व स्मशानभूमीजवळ अवैधरीत्या साठा करतात. तर स्थानिक टेम्पोधारक साठ्यावरून वाळू भरून बाहेरगावी विक्री करतात. हा गोरखधंदा एक महिन्यापासून बिनबोभाट सुरू होता. याकडे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याबाबत शनिवारी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन जागे झाले.
कानडी फाटा ते गावापर्यत असणाºया रोडवरील पुलाजवळ अंदाजे ३० ते ४० ब्रास, स्मशानभूमीजवळ अंदाजे २० ते ३० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. यावेळी साठा करताना ट्रॅक्टर व साठ्यावरून वाळू भरण्याच्या तयारीत टेम्पो आढळून आले. सदर ट्रॅक्टर व टेंपोचालकांनी पळ काढला. ही कारवाई कानडी सज्जाचे तलाठी एन.एस.चिंचोले यांनी रविवारी दुपारी केली. कारवाई दरम्यान वाळू माफियांनी वाहनाचे फोटो घेणाºया तलाठ्याला वाहनाविरुद्ध कारवाई करू नये म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले .
याबाबत तलाठी एन.एस. चिंचोले य्म्हणाले की, कानडी फाटा ते गावापर्यत असणाºया रोडवरील पुलाजवळ अंदाजे ३० ते ४० ब्रास, स्मशानभूमीजवळ अंदाजे २० ते ३० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.