बोंडअळीमुळे ७० टक्के नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:29 AM2017-12-03T01:29:12+5:302017-12-03T01:29:17+5:30
औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
श्रीकांत पोफळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ५५०० अर्ज प्राप्त झाले असून, अर्जांचा ओघ सुरूच असल्याची माहिती प्रभारी कृषी अधिकारी आर. एम. राठोड यांनी दिली.
औरंगाबाद तालुक्यातील शेतकºयांचे यावर्षी खरिपात मोठे नुकसान झाले आहे. त्यात कापूस महत्त्वाचे पीक आहे. कापूस पिकाचे एकूण क्षेत्र ४५,९३२ हेक्टर आहे. मागील वर्षी तालुक्यातील कापसाचे उत्पादन ७८० मेट्रिक टन झाले होते. त्यात ४५०० भावाने एकूण ३५१ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडले होते. यावर्षी १९५ मेट्रिक टन उत्पादन असून, ४५०० रुपयांच्या दराने त्याचे एकूण मूल्य ८.५ ते ९ कोटी उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. यंदा ७५ टक्के नुकसान कापूस उत्पादक शेतकºयांना सहन करावे लागणार आहे. दोन महिने पावसाने उघडीप दिली त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली, परतीच्या पावसाने थोडी फार आशा निर्माण झाली होती; परंतु बोंडअळीने पुन्हा शेतकºयांच्या हसºया चेहºयावर नैराश्य पसरले. लागवडीसाठी केलेला खर्चदेखील निघणार नाही. सर्वच शेतकºयांना फक्त पहिल्या वेचणीत जास्तीत जास्त कापूस चांगल्या दर्जाचा काढता आला. दुसºया वेचणीत बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले व कपाशी बोंडअळीमुळे बाधित झाल्याने तालुक्यातून नुकसानभरपाईची जोरदार मागणी झाली. त्यानंतर सरकारने कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले.
अर्ज स्वीकारणे व पंचनामे युद्धपातळीवर सुरू
तालुका कृषी कार्यालयामार्फत अर्जांचे वाटप करण्यात आले असून, या अर्जांसोबत कापसाचे बियाणे खरेदीचे बिल, सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. बाधित शेतकºयांनी कृषी कार्यालयात अर्ज केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर पंचनामा करीत आहे. ७० ते ८० टक्के कापूस बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.