छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७० हजार नवमतदार पहिल्यांदाच करणार मतदान
By विकास राऊत | Published: September 6, 2024 08:26 PM2024-09-06T20:26:06+5:302024-09-06T20:26:28+5:30
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २ हजार ८९८ मतदान केंद्र होते. आता ३६६ मतदान केंद्रांची भर पडली आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आचारसंहिता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा आहे. मतदारांची अंतिम यादी नुकतीच जाहीर झाली असून जिल्ह्यात नवमतदारांची संख्या ७० हजार २४२ वर गेली असून ते मतदार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.
जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या २७ हजार १८८ आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २ हजार ८९८ मतदान केंद्र होते. आता ३६६ मतदान केंद्रांची भर पडली आहे. एकूण मतदान केंद्र ३ हजार २६४ आहेत. सिल्लोड मतदान केंद्र ४०६ आहेत. कन्नड मध्ये ३६८, फुलंब्री ३७१, पैठण ३५१, गंगापूर ३७२, वैजापूर ३५३, औरंगाबाद मध्य ३२०, पश्चिम ४०१ तर पूर्व विधानसभा मतदारसंघात ३२२ मतदान केंद्र आहेत. अंतिम यादीनुसार जिल्ह्यात ३१ लाख ४५ हजार २०३ मतदार झाले आहेत. यात १६ लाख ३९ हजार ६४० पुरूष, १५ लाख ५ हजार ४२३ महिला तर १४० इतर मतदार आहेत. दुबार नावे, स्थलांतरीत अशा २० हजार ५४५ मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. तर २२ हजार ७३१ मतदारांच्या नावांमध्ये दुरुस्ती केली आहे. असे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.
१८ ते १९ वयातील मतदार किती?
सिल्लोड ९ हजार २२४,
कन्नड ६ हजार ५८१,
फुलंब्री ७ हजार ७२१,
औरंगाबाद मध्य ८ हजार ४६०,
पश्चिम ९ हजार २३९,
पूर्व ७ हजार ३२९,
पैठण ६ हजार ८८५,
गंगापूर ७ हजार ९७०,
वैजापूर ६ हजार ८३३
विधानसभानिहाय मतदार किती?
विधानसभा - मतदार संख्या
सिल्लोड - ३५०१६४
कन्नड - ३२८१९५
फुलंब्री - ३६३२९९
पैठण - ३१९८१५
गंगापूर - ३५७१९०
वैजापूर - ३१५८७१
औरंगाबाद मध्य - ३६४२९१
पश्चिम - ३९९३२५
पूर्व - ३४७०५३
एकूण - ३१,४५,२०३
वयोगटानुसार जिल्ह्यातील एकूण मतदार
वयोगट - मतदार संख्या
१८ ते १९ - ७०२४२
२० ते २९ - ६८२६९९
३० ते ३९ - ७७६०५५
४० ते ४९ - ६४०९८३
५० ते ५९ - ४७०७१६
६० ते ६९ - २७४७०५
७० ते ७९ - १५०४८८
८० वर्षांवरील - ७९३१५
एकूण मतदार -३१४५२०३