७१ बाधितांची भर, ५२ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:04 AM2021-02-13T04:04:56+5:302021-02-13T04:04:56+5:30

--- औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी ७१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नसून ५२ ...

71 affected, 52 on leave | ७१ बाधितांची भर, ५२ जणांना सुटी

७१ बाधितांची भर, ५२ जणांना सुटी

googlenewsNext

---

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी ७१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नसून ५२ जणांना विविध रुग्णालयांतून उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. यात शहरातील ४२ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ५२९ एवढी झाली आहे. आजपर्यंत ४६ हजार ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण १२४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

---

मनपा हद्दीत ६३ रुग्ण

---

देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेज २, वेदांतनगर १, उस्मानपुरा २, एन-४ सिडको ७, बीड बायपास ३, एन-११ हडको १, एन-३ सिडको २, बेगमपुरा १, हनुमान टेकडी १, कमलनयन बजाज हॉस्पीटल, मुलींचे वसतीगृह १, सातारा परिसर १, पी.डब्ल्यू.डी. कॉलनी १, क्रांतीचौक १, जटवाडा रोड १, न्यू हनुमाननगर, गारखेडा १, चिकलठाणा १, जय भवानीनगर ३, एस.बी.आय. झोनल ऑफिस १, पी. ई.एस. कॉलेज २, टी.व्ही. सेंटर १, एन-२ सिडको १, श्रेयनगर २, उस्मानपुरा १, विटखेडा १, म्हाडा कॉलनी २, अन्य २२

---

ग्रामीण भागात ८ रुग्ण

--

लासूर स्टेशन १, करमाड २, अन्य ५ रुग्ण बाधित आढळून आले.

Web Title: 71 affected, 52 on leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.