मराठवाड्यात ७२ हजार विद्यार्थी देणार अभियांत्रिकीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:39 AM2018-05-10T00:39:11+5:302018-05-10T00:40:07+5:30
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, बी. टेक., आर्किटेक्चर, व्हेटर्नरीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि.९) राज्यभरात प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ३२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ७२ हजार ९२५ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, बी. टेक., आर्किटेक्चर, व्हेटर्नरीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि.९) राज्यभरात प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ३२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ७२ हजार ९२५ विद्यार्थीपरीक्षा देणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-२०१८ ची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. नीट, जेईई या परीक्षेनंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाची असलेली ही परीक्षा आहे. या सीईटीच्या माध्यमातूनच यावर्षीपासून कृषीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे परीक्षेला अर्ज करणाºया विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी १२ टक्क्यांनी अधिक वाढली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाºयांनी सांगितले. ही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. यात विविध अभ्यासक्रमांचा समावेश असल्यामुळे दोन सत्रांऐवजी तीन सत्रांत ही परीक्षा होत आहे. या परीक्षेची तयारी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात आणि तंत्रशिक्षण सहसचिव कार्यालयाच्या समन्वयातून ही परीक्षा पार पाडण्यात येत आहे.
परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी
एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्रावर कोणताही गोंधळ होऊ नये, परीक्षा सुरळीत पार पाडली जावी, यासाठी परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतराच्या आतील सर्व प्रकारची झेरॉक्स केंद्र, एसटीडी कॉल सेंटर बंद ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.