दोन दिवसांत ७४ कोरोना बळी, २,३८८ नव्या रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 01:09 PM2021-03-31T13:09:32+5:302021-03-31T13:11:05+5:30
corona virus in Aurangabad जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८१,१३७ झाली आहे. यात ६४,२१८ जण कोरोनामुक्त झाले आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे अक्षरश: थैमान सुरू असून, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६९ आणि अन्य जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत उच्चांकी ४७ रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल २,३८८ नव्या रुग्णांची भर पडली, तर २,७२० रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या १५,२६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८१,१३७ झाली आहे. यात ६४,२१८ जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत १,६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत नव्याने आढळलेल्या २,३८८ रुग्णांत मनपा हद्दीतील १,६८३ आणि ग्रामीण भागातील ७०५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २,००७, तर ग्रामीण भागांतील ७१३ अशा २,७२० रुग्णांना सुटी देण्यात आली.
या भागांतील रुग्णांचा मृत्यू
उपचार सुरू असताना ज्योतीनगरातील ५३ वर्षीय महिला, हनुमाननगरातील ५५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७५ वर्षीय महिला, बालाजीनगरातील ७० वर्षीय पुरुष, रांजणगाव येथील ४५ वर्षीय महिला, पंढरपूर येथील ६१ वर्षीय महिला, घाटी परिसरातील ५६ वर्षीय महिला, आनंदनगर, गारखेडा परिसरातील ६५ वर्षीय महिला, बालाजीनगरातील ६० वर्षीय पुरुष, कादरीनगरातील ४० वर्षीय महिला, समर्थनगर येथील ६७ वर्षीय महिला, नवीन कायगाव, गंगापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, जयसिंगपुर्यातील ६८ वर्षीय पुरुष, वडोदबाजार, फुलंब्री येथील ६९ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ६१ वर्षीय पुरुष, स्टेशन रोड परिसरातील ४६ वर्षीय महिला, शहानूरमियाँ दर्गा परिसरातील ९० वर्षीय पुरुष, उत्तरानगरीतील ७० वर्षीय महिला, जयभवानीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, मयूर पार्क येथील ४० वर्षीय पुरुष, पदमपुर्यातील ८० वर्षीय पुरुष, गारखेड्यातील ७८ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ७८ वर्षीय पुरुष, रोझाबाग येथील ७६ वर्षीय महिला, साईनाथनगर, सातारा परिसरातील ६२ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ७९ वर्षीय पुरुष आणि जळगाव जिल्ह्यातील ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
तर गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरीतील ४९ वर्षीय पुरुष, गारखेड्यातील ८० वर्षीय पुरुष, पैठणमधील ६० व ५८ वर्षीय पुरुष, कॅनॉट प्लेसमधील ७१ वर्षीय पुरुष, कटकट गेट येथील ६५ वर्षीय परुष, सिडकोतील ५८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील २९ दिवसीय चिमुकला, हर्सुल येथील यासिन नगरातील ३९ वर्षीय पुरुष, पाटील गल्ली, वैजापुरातील ९२ वर्षीय स्त्री, ८० वर्षीय स्त्री, ६५ वर्षीय पुरुष, औरंगाबाद शहरातील जयभवानी नगरातील ७० वर्षीय पुरुष, कन्नडमधील ६७ वर्षीय स्त्री, घाटी परिसरातील ४८ व ८१ वर्षीय पुरुष, कन्नड येथील सहा महिन्यांची चिमुकली, देवळाई परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, मयूर पार्क हर्सुल येथील ७० वर्षीय पुरुष, एन दोन सिडकोतील ७८ वर्षीय पुरुष, जुबली पार्क येथील १४ वर्षीय मुलगा, सातारागावातील ७९ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील ७० वर्षीय स्त्री, गदाना, खुल्ताबाद येथील ४५ व ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६१ वर्षीय पुरुष, औरंगाबादेतील सादात नगरातील ५५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ३८ वर्षीय पुरुष, औरंगाबादेतील मोंढा नाका येथील ६५ वर्षीय पुरुष, उस्मानपुरा येथील ५० वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील ७० वर्षीय पुरुष, छावणीतील ६४ वर्षीय स्त्री, लाडसावंगीतील ७० वर्षीय पुरुष, एन सहा येथील ७५ वर्षीय स्त्री, देवळाई रोड येथील ६५ वर्षीय पुरुष, शिल्पनगरातील ८० वर्षीय स्त्री, संघर्ष नगरातील ५४ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ८६ वर्षीय पुरुष, जयभवानी नगरातील ४२ वर्षीय पुरुष, हर्सुल येथील ५१ वर्षीय स्त्री, चंपा चौकातील ६३ वर्षीय पुरुष, राम नगरातील ८३ वर्षीय पुरुष, लाडसावंगीतील ५२ वर्षीय पुरुष आणि भाेकरदन-जालना येथील ५६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, पीरकल्याण-जालना येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
गौतमनगर १, गारखेडा १, हडको ३, मुकुंदवाडी ११, सुभाषचंद्रनगर २, वानखेडेनगर १, एन १, सिडको १, एन -२, सिडको ७, एन -३, सिडको १, एन -४, सिडको ७, एन -९ सिडको १, देवळाईनगर ६, पटेलनगर बीड बायपास ७, कांचनवाडी १, जवाहर कॉलनी २, प्रकाशनगर १, म्हाडा कॉलनी ३, रामनगर १, रेल्वे कॉलनी १, बन्सीलालनगर १, भीमाशंकरनगर १, हर्सुल ३, कासलीवाल ३, सिंधी कॉलनी १, कोटला कॉलनी १, आनंदनगर १, गादीया विहार १, सातारा परिसर ७, गजानन कॉलनी १२, पुंडलिकनगर ३, भोईवाडा १, भावसिंगपुरा १, बेगमपुरा १, जाधववाडी १, पवननगर १, सिल्क मिल्क कॉलनी २, शिल्पनगर १, जालाननगर ६, आरटीओ रोड ४, मयूरबन कॉलनी दर्गा चौक २, इटखेडा ८, समर्थनगर २, फॉरेस्ट कॉलनी १, मिटमिटा १, नारळीबाग १, विवेकानंद कॉलनी १, भानुदासनगर १, ज्योतीनगर ५, काल्डा कॉर्नर १, कैलासनगर १, तिरुपती इन्क्लेव्ह १, सिद्धार्थनगर १, न्यू उस्मानपुरा २, नूतन कॉलनी १, न्यू श्रेयनगर ४, कांचनवाडी ७, पेठेनगर १, पैठण रोड १, बालाजीनगर १, शांतिनिकेतन कॉलनी २, पडेगाव ३, आदर्शनगर १, लक्ष्मी कॉलनी १, शिवाजीनगर ७, प्रथमेशनगर ३, नक्षत्रवाडी २, उल्कानगरी ६, न्यू हनुमाननगर ५, विठ्ठलनगर १, जयभवानी नगर ८, शहानूरवाडी २, नारायणनगर १, एमआयडीसी चिकलठाणा १, राजीव गांधीनगर १, मिल कॉर्नर ३, राजनगर २, प्रकाशनगर १, न्यू एसटी कॉलनी १, दशमेशनगर २, अजबनगर २, गुलमंडी २, दिवाणदेवडी १, विश्रांतीनगर २, केशवनगर १, दिशानगर बीड बायपास १, पेशवेनगर १, चंद्रशेखरनगर १, गारखेडा ४, देवळाई परिसर ३, बेंबडे हॉस्पिटल परिसर २, गारखेडा ९, स्वामी समर्थनगर २, सरस्वतीनगर १, रेणुकानगरी २, चेतनानगर १, बाळकृष्णनगर २, शिवशंकर कॉलनी २, आकाशवाणी परिसर १, सूतगिरणी चौक १, विष्णूनगर २, खिवंसरा पार्क १, छत्रपतीनगर २, दीक्षा संकुल २, विश्वंभर कॉलनी १, टिळकनगर २, निरंतर कॉलनी १, विशालनगर २, देशमुखनगर १, उस्मानपुरा १, बालाजीनगर १, अरुणोदय कॉलनी १, अहिंसानगर ३, खोकडपुरा २, ठाकरेनगर २, बजरंग चौकी १, उत्तरानगरी २, सुराणा नगर १, सुदर्शननगर १, सुधाकरनगर २, मोतीवालनगर १, राधास्वामी कॉलनी ३, रामनगर १, हुसेन कॉलनी २, साईनगर १, घाटी परिसर ५, छावणी १, सप्तश्री वाटिका ३, सर्वेशनगर १, पुष्पनगर १, अन्य ५५७, औरंगाबाद २, सातारा परिसर ७, गारखेडा १२, बीड बायपास १२, ब्रिजवाडी १, मछली खडक १ गजानन कॉलनी २, श्रीनिकेतन कॉलनी २, हर्सुल ५, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटलजवळ १, पुंडलिकनगर १०, जयभवानी नगर ७, श्रेयनगर १, भावसिंगपुरा १, ज्योतीनगर ४, गांधीनगर १, उद्योग इंदिराकमल १, नाथपूरम ३, समर्थनगर ४, महेशनगर १, मंगेशनगर १, शहागंज १, वेदांतनगर ४, उल्का नगरी १३, माणकनगर १, मित्रनगर २, अजबनगर १, पडेगाव २, एन-६ येथे २, पाणदरीबा १, नारेगाव २, एन-७ येथे ६, टी.व्ही.सेंटर २, एन-९ येथे ९, एन-३ येथे ३, एन-८ येथे १०, होनाजीनगर २, जाधववाडी ३, बन्सीलालनगर २, एन-५ येथे ८, पवननगर १, भगतसिंगनगर २, एन-११ येथे ३, कृष्णानगर १, मयूर पार्क ३, शिवेश्वर कॉलनी ४, नवजीवन कॉलनी २, मयूरनगर १, एन-२ येथे २४, भगवती कॉलनी २, स्वप्ननगरी ३, विजयनगर १, रोकडिया हनुमान कॉलनी १, गणेशनगर १, जवाहर कॉलनी २, बाळकृष्ण कॉलनी १, विशालनगर १, रेणुकानगर ३, देवानगरी २, रामनगर १, आनंदनगर १, म्हाडा कॉलनी १, मुकुंदवाडी ४, नंदीग्राम कॉलनी ३, हरिकृष्णनगर २, एन-१ येथे ३, अरिहंतनगर १, अलंकार सोसायटी १, टिळकनगर १, गजानननगर १, हडको कॉर्नर २, एन-४ येथे १३, कॅनॉट प्लेस ४, समर्थ रेसिडेन्सी १, मीनाताई ठाकरेनगर १, मातोश्रीनगर १, व्यंकटेशनगर २, प्रतीक प्लाझा १, राजीव गांधीनगर १, परिजातनगर १, हनुमाननगर ४, विश्रांतीनगर ३, न्यू हनुमाननगर २, दर्शन प्लाझा १, सिडको ८, महालक्ष्मी चौक १, आकाशवाणी २, खारपाडी १, एशियन हॉस्पिटल ५, गुरुप्रसादनगर १, खडकेश्वर १, नारळीबाग १, नाथनगर १, मिल कॉर्नर १, मोहनलालनगर ४, गादिया विहार रोड २, पंचवटी सोसायटी १, चौधरी हेरिटेज १, कांचनवाडी १, रशिदपुरा १, बजरंग चौक १, सूतगिरणी चौक ४, विष्णूनगर ३, विजय चौक १, भानुदासनगर २, क्रांती चौक १, निझाम बंगला छावणी परिसर १, पुष्पनगरी १, दशमेशनगर ३, चिकलठाणा १, सुराणानगर १, शिल्पनगर २, वल्लभनगर १, तापडिया गार्डन १, म्हाडा कॉलनी १, नागेश्वरवाडी २, रेल्वे स्टेशन १, सुंदरनगर १, शिवाजीनगर ४, एसबीआय कॉलनी १, रचनाकार कॉलनी ३, शुभम सोसायटी १, प्रगती कॉलनी ३, शहानूरवाडी ३, ईटखेडा १, न्यू बालाजीनगर १, नंदनवन कॉलनी २, बंजारा कॉलनी १, चौराहा १, देवळाई परिसर १, नाईकनगर २, नक्षत्रवाडी १, डिंबर गल्ली बेगमपुरा १, आदिनाथनगर १, उमरीकर लॉज १, चाणक्यपुरी ४, उद्धव साक्षी १, अन्य ४७०.
ग्रामीण भागातील रुग्ण
पिशोर १, बजाजनगर ३, वाळूज ४, प्रतापनगर १, शेंद्रा ३, पिंपळगांव १, अन्य ४०६,बजाननगर ६, सिडको वाळूज महानगर ५, वडगाव कोल्हाटी ३, वालसावंगी १, वैजापूर १, सांजूळ १, पिसादेवी ३, भराडी १, मुंगी शेवगाव १, वेरुळ १, अंबेलोहळ १, रांजणगाव शेणपुंजी २, वाळूज हॉस्पिटल वाळूज १, सिल्लोड १, पंढरपूर १, आतेगाव कन्नड १, साजापूर घाणेगाव १, लव्हाळी जैतपूर १, पैठण १, बिडकीन १, चितेगाव २, गल्ले बोरगाव १, दरेगाव खुल्ताबाद १, अन्य २४८.